Home साहित्य होऊ या व्यसनमुक्त…

होऊ या व्यसनमुक्त…

2

साजरे करतो आपण
जगभर अनेक डे
सर्वात महत्वाचा आहे तो
आजचा व्यसनमुक्ती डे

दारु, सिगारेट, तंबाखू, गर्द
सारीच व्यसनं आहेत जीवघेणी
दुर्दैवाने व्यसनाधीन होतायत
तरुणांच्या जोडीला चक्क तरुणी

दारू सिगारेट पिणं
म्हणजे नरकात जाणं
सोन्यासारख्या देहाची
नासाडी करणं

दारुच्या रुपात दिसते
पुतना राक्षसीण अनेक घरात
विष कालवते ती
शेकडो हजारो संसारात

जागोजागी दिसतायत
दारुच्या आहारी गेलेले तळिराम
ज्या घरात दारुड्या राहतो
त्या घरात कसला आलाय राम

उध्वस्त करते दारू
भरल्या संसाराला
देशोधडीला लावते
घरच्या लक्ष्मीला

पोराबाळांच्या शिक्षणाची
होते फरपट
फसफसत फिदी फिदी हसते दारू
अब्रूची लक्तरे वेशीवर टांगत

कामावर जायच्या ऐवजी
झिंगत पडतात भर दिवसा
का रे आठवते
माणसा तुला अशी अवदसा

नाहीतर मग संपवून टाकतो दारूत
दिवसभर कमावलेला पैका
संसाराची अशी राखरांगोळी
करू नका बाबांनो जरा ऐका

ओठाला लावलेला दारुचा प्याला
असतो आयुष्यावरचा घाला
दारू बनवून नासवू नका
जीवनसंजीवनी अमृतरुपी पाण्याला

देवाने तयार केलं पाणी
त्याची दारू केली माणसांनी
वाया जाते शिक्षण नोकरी
पद प्रतिष्ठा दारुच्या बाटलीमधुनी

राजेंद्र वाणी

– रचना : राजेंद्र वाणी. दहिसर, मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️  9869484800

2 COMMENTS

  1. श्रीकृष्णकांत सासवडे सर , श्री अमोल सासवडे आणि परिवार

    मा.श्री राजेंद्र जी वाणी,
    सस्नेह नमस्कार.

    आपण आपल्या काव्यातून व्यसनामुळे संसार कसे उध्वस्त होतात,याचे जाणीव पूर्वक लेखन केले आहे.

    यातून तरुणांनी जाणीव पूर्वक बोध घ्यावा.

    माणसाला व्यसनामुळे समाजात ,कोठेही किंमत राहात नाही, आपल्या पालकांना ताठ मानेने जगता येयला पाहिजे असेल व्यसनाधीन तरुणांनी जाणीव पूर्वक शिकवण घ्यावी.

    शेवटी
    “आरोग्य हीच खरी संपत्ती आहे”.
    व्यसनापासून दूर रहा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version