Wednesday, March 12, 2025
Homeसेवाजातनिहाय साहित्य संमेलने : आपल्याला काय वाटते ?

जातनिहाय साहित्य संमेलने : आपल्याला काय वाटते ?

एकीकडे साहित्य हे वैश्विक असावे, साहित्याने देशोदेशींच्या सीमा ओलांडून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, करुणा मानवता, एकात्मता या भावना जोपासल्या गेल्या पाहिजेत, अशी अपेक्षा आहे. तर  कितीही कटू असले तरी जे सत्य आहे, ते म्हणजे भारतीय समाज व्यवस्थेचे दारुण वास्तव असलेली जात व्यवस्था काही केल्या जाता जात नाहीय.

या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस, निदान महाराष्ट्रात तरी जात निहाय साहित्य संमेलने भरू लागली असून ती वाढतच चालली आहेत. मी स्वतः अशा काही संमेलनांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलो आहे.
अजून ही अशी आमंत्रणे मला येत असतात, संवाद साधण्याचे हे एक साधन आहे, म्हणून मी जातही असतो. तिथे तिथे समयोचित भाषणे देखील करीत असतो. पण मला स्वतःला हा प्रश्न नेहमी पडत असतो की,अशी संमेलने असावीत की नसावीत ?

या बाबतीत तुम्हाला काय वाटते ? तुमचे विचार, मते, अनुभव आम्हाला 9869484800 या व्हॉट्स ॲप क्रमांकावर वर्ड फाइल मध्ये अवश्य कळवा.

आपल्या मजकुरासोबत आपला अल्प परिचय, पासपोर्ट आकाराची दोन तीन छायाचित्रे सुद्धा पाठवा.
निवडक प्रतिक्रिया *www.newsstorytoday.com* या पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात येतील.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. मुख्य प्रवाहाशिवाय विविध अंगांनी मराठी भाषा फुलते आहे. बोली भाषेत पात्रे आपापल्या भाव भावना, सादर करण्यात भाषा समृद्ध होते. लेखन चटकदार, वैचारिक, भाष्य करणारे असेल तर अशा भाषा संमेलनाची गरज आहे. आमच्या वर प्राचीन काळापासून जीवन यापन करताना होत असलेल्या कुचंबणा, हीन वागणूक दिली अर्थिक पिळवणूक याचे भांडवल करून लेखन करू नये असे वाटते. दारिद्रय़ हे समाजाच्या प्रत्येकाला जाचक असे. गुलाम म्हणून विकले जात असणे भारताबाहेर त्या मानाने फारच भयानक असावे. दूर वरच्या समुद्र प्रवासात वल्हे मारणारे, वाळवंटातून जाताना वाटेत तांडे सांभाळणारे, जंगलतोड करून शेत जमिनी संपादित करण्यासाठी अत्याचाराला परिसीमा नसत… अशांच्या वेदना, सांगायला हव्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित
सौ.मिनल शशिकांत शिंदे, on चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम