Tuesday, September 16, 2025
Homeबातम्या'जीवन प्रवास' : साहित्य पुरस्कार जाहीर

‘जीवन प्रवास’ : साहित्य पुरस्कार जाहीर

संत नामदेव चरित्र साहित्य पुरस्कार सौ वर्षा महेंद्र भाबल, जुईनगर, नवी मुंबई, यांच्या “जीवन प्रवास” या आत्मचरित्रास जाहीर करण्यात आला आहे.
न्यूज स्टोरी टुडे, नवी मुंबई यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. विशेष म्हणजे न्यूज स्टोरी टुडे यांचे व लेखिकेचे ही हे पहिलेच पुस्तक आहे.

या बरोबरच अन्य साहित्य प्रकारातील पुरस्कार ही जाहीर करण्यात आले आहेत.

हे पुरस्कार २३ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदान करण्यात येतील, असे संत नामदेव साहित्य पुरस्कार संयोजक, प्रा.डॉ. श्रीराम मारोतराव कऱ्हाळे, मराठी विभागप्रमुख, शिवाजी महाविद्यालय, हिंगोली यांनी कळविले आहे.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. सौ वर्षा भाबल यांचे लिखाण प्रवाही आहे.त्यांनी प्रांजळपणे आत्मचरित्र लिहिले आहे. या आत्मचरित्रातील प्रसंग मनाला भावतात.त्यांनी आपल्या कुंचल्यातून अनेक शब्द चित्रे या आत्मकथना मध्ये रेखाटली आहेत.या मध्ये त्यांनी कोठेही परिस्थितीचे भांडवल केलेले नाही.या उलट मी असे म्हणेन, ” आयुष्य माझ्या ओळखीचे कधीच नव्हते तरी देखील जमेल तसे जगत होते ” हा भाव त्यांच्या आत्मकथनामध्ये जाणवत आहे. सौ.वर्षा भाबल यांना प्राप्त झालेल्या पुरस्कारा बाबत त्यांचे हार्दिक अभिनंदन.पुरस्काराने प्रेरणा मिळते. त्यांच्या हातून अनेक उत्तमोत्तम साहित्य सेवा घडो अशी आशा करतो व त्यांना पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा देतो.
    चंद्रशेखर गाडे
    निवृत्त महाप्रबंधक
    मी.टे.नि.लि.मुंब‌ई

  2. सॊ वर्षा भाबल यांना संत नामदेव चरित्र पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल सौ. वर्षा भाबल यांचे वरळी वंडर्स व्हाट्सअप ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
    🙏 एम. बी. आरोटे

  3. वर्षा खुप खुप अभिनंदन💐💐💐शुभेच्छा पुढच्या वाटचालीस👍👍👍

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments