तुमचं आमचं काय नसतं,
जीवात जीव असे पर्यंत,
माझं तुझं वाटत असतं !
जन्माला येताना काय आणलं ?
बंद मुठीत उघडे शरीर,
मिटलेल्या डोळ्यात रडू दिसलं !
आईच्या पान्हयात भूक शमली,
मायेच्या ऊबेत छाया गवसली,
आईच आपलं विश्व झाली !
देवाच्या रूपात मायबाप लाभले,
दिवस रात्र राबत राहिले,
फोडा प्रमाणे जपत गेले !
जगाचा देखावा पाहत राहिलो,
लोभ क्रोधात भारावून गेलो,
नात्यांना जपणे विसरत राहिलो !
हमरी तुमरी भाषा शिकलो,
माझे माझे म्हणण्याच्या नादात,
माणुसकीला काळिमा फासत राहिलो !
येतो रिक्त जातो रिक्त,
मानवी जन्म लाभतो सुदैवाने,
दुसऱ्यांना सुख वाटावे फक्त !
अति धन जीवाला घोर,
तृप्त मन देई शांती,
दान वृत्ती संतांचा वर !
हसत जगणे जीवनी सार,
जीव मारुनी जगणे कशास ?
जग दिसे मोहक फार !
काय आणले ? काय नेले ?
सारे काही इथेच राहिले,
चार दिवस सारे रडले !

– रचना : सौ.वर्षा महेंद्र भाबल
जीवनाचा खरा अर्थ दडलेला आहे.ज्याला हे कळले तोच खरा सुखी, समाधानी आहे.उत्तम ,मर्मभेदी, कविता,छान वर्षा मॅडम.👌👌👌👌🌹🌹
जीवन सार सांगणारी कव्य रचना…
खूप छान मॅडम…