Home बातम्या जेष्ठ नागरिकांचा अवयवदान संकल्प.

जेष्ठ नागरिकांचा अवयवदान संकल्प.

0

नांदेड शहरातील डॉक्टर वैद्य हॉस्पिटल वजीराबाद येथे काल आयोजित जेष्ठ नागरिक संघ आणि रामकृष्ण विवेकानंद भावधारा यान्च्या संयुक्त विद्यमाने झालेल्या भव्य रोगनिदान शिबिरातील उपस्थित दिडशे जेष्ठ नागरिकांनी संयुक्तपणे अवयवदान संकल्प केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अवयवदार जनजागृती समितीचे प्रमुख, जेष्ठ पत्रकार माधव अटकोरे यानी अवयवदानाचे महत्त्व आणि गरज या विषयावर मार्गदर्शन करताना 2017 पासून नांदेड येथे सुरू झालेल्या चळवळीची माहिती दिली. तसेच सर्व उपस्थितांना अवयवदान करण्याचे आवाहन केले.

यावेळी डॉक्टर हंसराज वैद्य यानी अवयवदानाचे महत्त्व सांगताना जगातील कोणत्याही पवित्र कार्यापेक्षा अवयवदान हेच सर्व श्रेष्ठ दान असल्याचे मत व्यक्त केले. मागील सहा वर्षापासून माधव अटकोरे हे अत्यंत चांगले काम करीत असून आपण सर्वांनीच अवयवदान संकल्प करावा असे आवाहनही त्यांनी केले. डॉक्टर हंसराज वैद्य यानी अवयवदान प्रतिज्ञेचे वाचन केले. सर्वांनीच उत्तम प्रतिसाद दिला.

उपस्थित जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी शहरातील अनेक नामवंत आणि जेष्ठ समाजसेवक मोठ्या सन्ख्येने उपस्थित होते.

डॉ. हंसराज वैद्य, डॉक्टर ग्रीष्मा रामपूरकर, डॉ. दीपक केशरी, डॉ. संजय महाजन, डॉ. जयश्री आढाव बोडखे यानी रोगनिदान शिबिरात महत्त्वाचे योगदान दिले.

जेष्ठ समाजसेवक अनंतराव करजगीकर, भिमराव तरटे, प्रभाकर कुंटूरकर, मिर्झा मुनिरबेग याचेसह १५० जेष्ठ महिला पुरूष यावेळी उपस्थित होते.

  • — टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version