माध्यम क्षेत्रातील शान
अनेकांचे प्रेरणास्थान
भुजबळ सरांचा जेथे मान
न कोणता अभिमान
जशी चंदनाची सहान
झिजती हरपुनी देह भान
साहित्यिकांची ही खाण
फुलविती उजाड रान
असे आपलेपणाची जाण
आदर्श व्यक्तिमत्त्व,उत्तम वक्तृत्व
अनेक क्षेत्रात ज्यांचे कर्तृत्व
मात्र माणुसकी हे एकच तत्व
प्रतिष्ठित हे नाव
निस्वार्थी भाव
नसे अहंकाराचा ठाव
ज्ञानाचा खजिना
पत्रकारितेतील हा हिरा
सांभाळून ठेवा हा अनमोल दागिना
लेखकांचा भक्कम आधार
अलकाताईंच्या सोबतीने
पोर्टलचा उचलतात सर्व भार
सामाजिक कार्याचा घेऊनी वसा
न्युज स्टोरी टुडे पोर्टलचा
देश विदेशात ठसा.

— रचना : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
भुजबळ सरांवर खूप छान कविता लिहिली