Friday, October 18, 2024
Homeसंस्कृतीज्येष्ठांचा वाढदिवस

ज्येष्ठांचा वाढदिवस

वाढदिवस साजरा करायला सर्वांना आवडतो, तो ही साठी नंतरचा म्हणजे जेष्ठ झाल्यानंतरचा वाढदिवस. आपल्या ज्येष्ठ मित्रां सोबत आणि त्या महिन्यात आलेल्या आपल्या ज्येष्ठ मित्रां चा सुध्दा सामूहिक वाढदिवस साजरा करताना होणारा आनंद काही औरच. ज्येष्ठ नागरिक संघ आपल्या सदस्यांसाठी विविध उपक्रम आयोजित करीत असतात आणि ते आवश्यकही आहेच. असाच दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी होणारा ज्येष्ठ नागरिक संघ सानपाडा येथे होणारा सामूहिक वाढदिवस हा त्यातीलच एक.

काल ३१ जुलै रोजी जेष्ठ नागरिक संघ सानपाडा येथे जुलै महिन्याचा सामूहिक वाढदिवस हा कार्यक्रम झाला. त्या निमित्ताने ६० ते ८८ वयोगटातील एकूण ७४ सदस्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या आनंद मेळ्यास एकुण ३१० सभासद उपस्थित होते. ज्यांनी वयाची ७५ री पूर्ण केली त्यांना शाल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या निमित्त मनोरंजन पर विनोद सांगून, तसेच भारुड, आणि अधिक मासा निमित्त विविध गाणी ज्येष्ठ सदस्यांनी गायली.

जेष्ठ नागरिक संघ, आपापल्या सदस्यांसाठी विविध उपक्रम आयोजित करीत असतात आणि ते आवश्यकही आहेच. पण
जेष्ठ नागरिक संघातील सदस्यांनी आपल्या अनुभवाचा, ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करण्यासाठी अशा ज्येष्ठ नागरिक संघात मार्गदर्शन व मदत केंद्रे सुरू करावीत, अशी अपेक्षा माध्यमकर्मी श्री देवेंद्र भुजबळ यांनी व्यक्त केली. ते सानपाडा जेष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या वाढदिवस कार्यक्रमात बोलत होते.

सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून श्री भुजबळ यांनी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याच्या कामी या संघाने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

या संघात काल, ३१ जुलै रोजी सर्वात मोठया कार्यक्रमाचे आयोजन कार्यकारी मंडळाने केले होते. या आनंद ‌मेळाव्यास एकूण ३१० सभासद उपस्थित होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून माजी नगरसेवक श्री सोमनाथ वासकर उपस्थित होते.
त्यांनी ही यथोचित मार्गदर्शन करून ‌सर्व ज्येष्ठांना छत्री वाटप केले. तसेच संघास आर्थिक सहकार्य करून ज्येष्ठांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती विजया गोसावी आणि कार्यकारी अध्यक्ष श्री विठ्ठल गव्हाणे यांनी केले. सचिव श्री राजाराम खैरनार, खजिनदार श्री ‌विष्णुदास मुखेकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महत्वाचे योगदान दिले.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on चलो, अमरावती !
वर्षा महेंद्र भाबल on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
सौ.मृदुलाराजे on विजयादशमी
सौ.मृदुलाराजे on चलो, अमरावती !
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था , महाराष्ट्र. on गुरूंच्या आठवणी
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” :  १०
डॉ. प्रशांत भुजबळ on अभिनव टपालदिन