Homeसेवाज्येष्ठांनी लुटला कॅरम, बुद्धिबळ स्पर्धांचा आनंद !

ज्येष्ठांनी लुटला कॅरम, बुद्धिबळ स्पर्धांचा आनंद !

नवी मुंबईतील सानपाडा विरंगुळा ज्येष्ठ नागरिक केंद्रात नुकत्याच डबल्स कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या. चार दिवस चाललेल्या या स्पर्धांना सभासदांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

कॅरम डबल्सचे विजेते सर्वश्री दिनेश गायकवाड व उत्तम वाव्हळ, उप विजेते सर्वश्री दिलीप भागवत व बबन वाव्हळ तसेच बुद्धिबळ अंतिम विजेते सर्वश्री मनीष ज्यूएल्स, उप विजेते रमेश मोहिते हे ठरले. विजेत्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री मारुती विश्वासराव व माजी नगरसेवक श्री सोमनाथ वासकर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

सदर स्पर्धेसाठी श्री. जे. पी.देसाई व श्री वासकर यांच्यातर्फे स्पर्धकांना रोख बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेसाठी भविष्यात भरघोस मदत करण्याचे आश्वासन दोन्हीही मान्यवरांनी दिले.

अंतिम कॅरम स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून श्री प्रमोद हराळे तर बुद्धिबळ स्पर्धेसाठी श्री रेड्डी यांनी काम पाहिले.

या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सर्वश्री राजेश मांडेवाल, गजानन लोखंडे, राजाराम घोलप, सुभाष बारवाल अन इतर कार्यकर्त्यांनी हातभार लावला.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments