चेंडूची चिमणी…
चेंडूची चिमणी म्हटल्यावर आश्चर्य वाटले ना तुम्हाला? पण आज आपण चेंडूचीच चिमणी करणार आहोत. लहान मुलांचे खेळण्यातील रबरी चेंडू खेळून खराब होतात आणि आपण ते फेकून देतो. पण त्याच चेंडूची आज आपण इवलीशी गोजिरवाणी चिऊताई तयार करणार आहोत.
यासाठी एक साधारण मोठा रबरी चेंडू शरीर तयार करण्यासाठी घ्यावा. तो स्थिर उभा राहावा म्हणून त्याला खाली गोलाकार कापून थर्माकोल किंवा प्लॅस्टिकचे झाकण लावून स्टॅंड तयार करावा. चिमणीचा डोक्याचा भाग तयार करण्यासाठी टेबल टेनिसचा जुना बॉल घेऊन तो मोठ्या चेंडूवर फेव्हीकॉलने चिकटवावा.हे फोटोतील चिमणी बघून लक्षात येईलच.
त्यानंतर त्यावर रंगाने डोळे काढावेत. जाड पिवळ्या कागदाची चोच करावी. पंख तयार करण्यासाठी बिस्किटाच्या डब्यातील पांढरा कागद घ्यावा. त्याचे पंख फार सुंदर दिसतात. नसल्यास वेलव्हेट पेपरचे केले तरी चालतील.
चिमणी तयार झाल्यावर त्याला रंगाने रंगवून सुशोभित करावी. बस एवढे केले तयार होईल जुन्या चेंडूची साजरी गोजिरी चिऊताई. चिऊताई पाहून आपली लहान मुलं नक्कीच खुश होतील यात शंकाच नाही.
— लेखन:अरुणा गर्जे. नांदेड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खुपच सुंदर चिमणी.