महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेच्या गेल्या अडीच वर्षांपासून हिलदारी अभियाना अंतर्गत स्त्री मुक्ती संघटना व रिसीटी नेटवर्क प्रा.लि. यांच्या सहकार्याने महाबळेश्वर व आसपासच्या गावांमध्ये शाश्वत घनकचरा व्यवस्थापना साठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
यात स्थानिकांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत नावीन्यापूर्ण माध्यमातून जनजागृती करणे, सफाई मित्रांसाठी विविध प्रशिक्षण, आरोग्य तपासणी शिबीर, सुरक्षा साधनांचे वाटप, स्वच्छता मोहीम व शहरातील विविध भागधारकांना सदर उपक्रमात सहभागी करून घेणे इत्यादीचा समवेश आहे.

२१ वे शतक हे टेक्नॉलॉजि चे शतक आहे हे लक्षात घेवून रिसीटी च्या सहकार्याने नगरपालिकेने शाश्वत घनकचरा व्यवस्थापनासाठी सुद्धा टेक्नोलोजी ची मदत घेतली आहे. यात शहरातील सर्व आस्थापनांचा डिजिटली सर्वे करण्यात आला व प्रत्येक घर, दुकान, हॉटेल यांना क्यू.आर.कोड च्या माध्यमातून जोडण्यात आले. यासोबतच दररोज घंटागाडी च्या ड्रायव्हर व हेल्पर यांना मोबाईल फोन देण्यात आले व त्यात रिसीटी च्या वेस्ट इंटेलिजन्स टेक्नॉलॉजिच्या वापराबाबत त्यांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

आता दररोज कचरा गोळा करतांना घंटागडी च्या ड्रायवर मार्फत शहरात लावण्यात आलेले क्यू.आर. कोड स्कॅन करण्यात येतात व संबंधिताने कचरा दिला अथवा नाही आणि दिला असेल तर तो वर्गीकृत आहे अथवा नाही याची नोंद रिसीटी एप्लिकेशन मध्ये करण्यात येते. यामुळे शहरातील कचऱ्याचे संकलन व वर्गीकरण याबाबतीत प्रशासनाला एका क्लिक वर माहिती उपलब्ध होण्यास मदत होते.

याबाबत महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेच्या प्रशासक व मुख्याधिकारी पल्लवी पाटील म्हणाल्या की, गेल्या दोन वर्षापासून नगरपालिका रिसीटी च्या वेस्ट इंटेलिजन्स टेक्नोलोजी च्या मदतीने शहरातून गोळा होणाऱ्या कचऱ्याचे मॉनिटरिंग करते आहे. या आधी गोळा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण व संकलनाची नोंद ठेवण्यात अनेक अडचणी येत होत्या आणि या सगळ्यांचा अहवाल सुद्धा मॅन्यूअली तयार करावा लागत होता. परंतु रिसीटी च्या या टेक्नॉलॉजि मुळे वर्गीकरण व संकलनाचा अहवाल एका क्लिक वर उपलब्ध होतो आहे तसेच शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानात सुद्धा माहिती देणे सोयीचे झाले आहे. नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी सदर टेक्नोलोजी अतिशय उत्कृष्टपणे हाताळत असून यामुळे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे एंड तो एंड ट्रॅकिंग व ट्रेसिंग करणे अतिशय सोपे झाले आहे.
हिलदारीचे असिस्टंट मॅनेजर डॉ मुकेश कुळकर्णी यांनी सांगितले कि, रिसीटी ची वेस्ट इंटेलिजन्स टेक्नोलोजी यशस्वीपणे उपयोगात आणणारी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद हि राज्यातील पहिली नगरपालिका आहे. याबद्दल नगरपालिकेच्या प्रशासक व मुख्याधिकारी पल्लवी पाटील तसेच घंटागाडी ड्रायवर व संपूर्ण टीम चे मनापासून अभिनंदन.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800