Monday, October 20, 2025
Homeलेखडॉक्टरकीचा वसा

डॉक्टरकीचा वसा

डाॅक्टर या नावाची तशी मला लहानपणापासूनच आवड, ओढ म्हणाना ! त्यातच लहानपणापासून वडीलांचे, डॉ पांडुरंग राणभरे यांचे डाॅक्टरकीचे काम पहात होते, त्यांची रूग्णांबद्दल असलेली आपूलकी, कर्तव्यता, कष्ट बघत होते. त्याचबरोबर लोकांची त्यांच्यावर असणारी निष्ठा, आदर, विश्वास (२-२दिवस वडील भेटले नाही तर रूग्ण कुठेही जात नसत) यामुळे अभिमान वाटत असे. त्यात वडीलांच्या इच्छेने भर घातली आणि मी ह्या क्षेत्रात आले.

डाकट्-रऽऽऽ, अहो बाई ऽऽऽऽ हे शब्द सतत २४ तास आमच्या कानावर येतात आणि आम्हीही होऽऽ हो आलोच करत हातातलं काम सोडून पळत सुटतो. गेली ३० वर्ष ! आता त्याचे बारसे डाॅक्टर सर, डाॅक्टर मॅडम 😊असे झाले एवढेच !

सुरुवातीला आमच्या गावी चऱ्होलीत, आळंदीच्या अलीकडे मुक्कामी डाॅक्टर आम्ही एकमेव होतो. त्यावेळी पिण्याचे पाणी आम्हाला नदीवरून कोळी लोक १ रू. हंडा अश्या दराने आणून देत. आमच्याकडे बोअर असल्यामुळे वापरायचे पाणी होते, बाकी लोकांना मात्र सर्व पाणी नदीवरूनच आणावे लागे.

त्यावेळी आमचे गाव फारसे सुधारलेले नव्हते. छोटेसे खेडेगाव होते. त्या काळात लोकांना जाण्यायेण्यासाठी चालणे एवढाच पर्याय होता. बाकीच्या गैरसोयी त्याच्याबरोबर साहजिकच असायच्या. त्या काळापासून आम्ही गावकऱ्यांच्या हाकेला सतत तत्पर व हे काम अविरत चालूच आहे आणि चालूच राहणार आहे.

एक अनुभव, आठवण म्हणाना, …त्यावेळी माझा मोठा मुलगा १-२ वर्षाचा असेल. माझा दवाखाना तळमजल्यावर आणि पहील्या मजल्यावर निवास. त्याला सांभाळत, मी रूग्ण (त्यावेळी जरा खूपच गर्दी असायची) व घरातील इतर जबाबदारी निभवत होते.

एक दिवस त्याला झोपवून मी एका रूग्णाच्या, सततच्या हाकांमुळे, धावतच दवाखान्यात गेले, पहाते तो काय … २ वर्षाची  एक मुलगी, रक्ताने डोके, चेहरा डबडबलेला मोठमोठ्याने रडत…व बाकी ५-६ लोक तिच्या रडण्याला, घाबरून, भांबावून, रडून, आरडाओरडा करत गोंधळात भर घालत होते. मी प्रथम तीला तपासले, एकीकडे सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. जखम साफ करून, निर्जंतूक पट्टीचा दाब देऊन रक्तस्राव थांबेपर्यंत टाके घालण्याची तयारी केली.

टाके घालायला सुरवात केली …२ टाके राहिले असतील अन् आमचे चिंरजीव जीन्यातून मला हुंकार देऊ लागले. मी एखादाच हुंकार नकळत दिला असेल नसेल तोच धाऽड धाऽड जिन्यावर आवाज …😳😌😰
काही कळायच्या आत महाराजांची स्वारी, १०-१२ पायऱ्या कोलांट्या खात, जिना उतार ऽऽऽ हरि ॐ !😌 काहीच सुचेना, आईचे ह्रदय पिळवटून गेले😰, पण त्याला उचलून छातीशी कवटाळता येईना, की त्याला कुठे लागले, काय झाले हे ही बघता येईना. कारण समोर कर्तंव्य चालू होते. एकसारखीच घटना ! त्याच्याही डोक्यातून रक्त भळभळत होते. केवळ जखमेवर पट्टीचा दाब द्यायला सांगून मी माझ्या समोरचे कर्तव्य पूर्ण केले. तोपर्यंत मुलगा रडून रडून झोपी गेला होता .😌आजही, २५ वर्षांनंतर मुलाच्या कपाळावरच्या जखमेची खूण बघीतली की काळजात, एक कळ उमटते. अशा १-२ नाही तर अनेक प्रसंगांची मालिकाच डोळ्यापुढे उभी रहाते. विशेषत: डॅाक्टरांवरील भॅड हल्ल्याच्या बातम्या वाचल्या की मन बेचैन होते.

माझ्यासारखे लाखो डाॅक्टर आपले कर्तंव्य चोख बजावत असतात. तेव्हा या १ जुलैच्या डॅाक्टर दिनानिमित्त आपण एकमेकांचा हात हातात धरून सर्वांच्या निरोगी, आनंदी जीवनाचा पाया रचू या. जयहिंद.

– लेखन : डाॅ.स्वाती दगडे.
– संपादन: देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप