Home बातम्या डॉ बाळकृष्ण महाजन सन्मानित

डॉ बाळकृष्ण महाजन सन्मानित

0

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई द्वारा रंगशारदा सभागृहात नुकत्याच आयोजित पुरस्कार सोहळ्यात विधा पुरस्कार या कॅटेगरी मध्ये नागपूर येथील डॉ बाळकृष्ण रामभाऊ महाजन, यांना विष्णूदास भावे पुरस्कार नाटक (स्वर्ण) मध्ये 35000/- रू रोख रक्कम, प्रमाणपत्र, शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सुप्रसिद्ध अभिनेता आशूतोष राणा यांच्याहस्ते पुरस्कार देण्यात आला.

डॉ महाजन यांना हा पुरस्कार “आओ अपना देश सवारें” या नुक्कड नाटक संग्रह पुस्तकाला मिळाला. यावेळी सुप्रसिद्ध भजन सम्राट अनूप जलोटा आणि सुप्रसिद्ध अभिनेता मनोज जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ बाळकृष्ण रामभाऊ महाजन यांना यापूर्वी, 2016-2017 मध्ये त्यांच्या “आओ‌ मिलकर भारत जोड़ें” या नाटक संग्रहास विष्णूदास भावे पुरस्कार मिळाला होता.

डॉ महाजन यांची आतापर्यंत दहा पुस्तकें प्रकाशित झालेली आहेत. शिवाय अनेक लघुनाटकांचे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय केलेला आहे.

विशेष म्हणजे साहित्य, नाटक यातील योगदानाशिवाय डॉ महाजन हे ते करीत असलेल्या रक्त दानासाठी ही विशेषत्वाने ओळखल्या जातात. आता पर्यंत त्यांनी 117 वेळा रक्तदान केलेले आहे.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version