Saturday, July 5, 2025
Homeसाहित्यतळपला रवी......

तळपला रवी……

सावरकर म्हणजे व्यास आधुनिक
अलौकिक प्रतिभेचा जणू महाकवी !
नतमस्तक होऊनी झुकवितो माथा
दिशादर्शक देशाचा, तळपला रवी !

क्रांतिकारक ते, जेव्हा झाले बंदीवान
हादरले काळेपाणी आणि अंदमान !
नाही डगमगले जरा… नाही झुकलेही
त्याग आणि कर्तव्याचे फक्त ठेवले भान !

नाही केले पूजापाठ, खोटे थाटमाट
‘आपणच विश्वाचा भाग’ दिला दृष्टिकोन
तत्त्वनिष्ठ, चिंतनशील, विज्ञानवादीही
‘गुणदोष स्वीकारावे’ दिला कानमंत्र

वकृत्व-काव्य-साहित्य सावरकरांचे
पूर्णत्वाने कामी आले, स्वातंत्र्य मिळाले.
फडफडला तिरंगा आणि स्वप्न पूर्ण झाले
देशप्रेम जागवुनी आत्मार्पण केले

प्रतिभा सराफ

– रचना : प्रतिभा सराफ.

RELATED ARTICLES

10 COMMENTS

  1. तळपला रवी ।
    दिशादर्शक देशाचा ।
    भक्तिभाव विभोर कविता।
    प्रेरणादायी शब्दकळा ।
    अर्पिले विनायक चरणी ।।

    सादर वंदन !

    • भक्तिभाव विभोर कविता हे मनापासून आवडले. धन्यवाद अरविंद सर!

  2. प्रतिभाताई अतिशय सुंदर झाली कविता🌷
    असे क्रांतीवीर पुरुषांना सादर पूर्वक नतमस्तक होऊन नमस्कार 🙏 परत असे थोर पुरुष होणार नाही👍🏻

    • खरंच थोर पुरुष! लिहावे तितके कमीच…

  3. अतिशय सुंदर झाली कविता 🌷
    अशा क्रांतिकार थोर पुरुषांना नतमस्तक होऊन
    झुकावे 🙏
    असे परत कधी ना होणार👍🏻

  4. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याला उजाळा देणारी सुंदर रचना ताई👌👌👌👌

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments