Friday, November 22, 2024
HomeUncategorizedतुझ्यावर प्रेम करताना

तुझ्यावर प्रेम करताना

तुझ्यावर प्रेम करताना
स्वप्नी आला घनश्याम
विसरुन जावे भान
असे सुंदर नक्षीकाम //१//

मोरपीस मखमली स्पर्श
मनमोहक रुप साजरे
सुमधुर सुर बासरीचे
मन झाले माझे बावरे //२//

आतुरले होते मन माझे
जाण्यास तुझ्या बाहुपाशात
छेडलेल्या सुरात बासरीच्या
चलबिचल झाली मनात //३//

उबदार मिठीत शिरून
देह सारा गंधाळून गेला
नवीन नात्याची वीण गुंफता
चांदणचुऱ्याचा आहेर मिळाला //४//

तुझ्यावर प्रेम करताना
बरसून गेली श्रावणसरी
कधी ऊन तर कधी पाऊस
हिरवा शालू वसुंधरेवरी //५//

परवीन कौसर

— रचना : परवीन कौसर. बेंगलोर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments