छान मजेत चाललेले आयुष्य,
मी व माझे सुखी कुटुंबीय,
ठरलेले आणि साधे आनंदी जीवन,
अगदी हेवा करावा असे क्षण,
आणि कुठेतरी मी काही बघतो,
मला आवडते, मग ध्यास घेतो,
आणि येथून सुरू होते ती तुलना,
विस्कळीत करते, दुःखी मना,
आधी, ही स्वप्ने आहेत कळत होते,
हे शक्य नाही हे ही पटत होते,
पण काही सिनिमे, सिरीयल बघतो,
आणि मी नको ते करून बघतो,
आतला आवाज करतो जागृत,
हे चुकीचे आहे, हे आहे विकृत,
पण मोहाने अंध होतो, गोंधळतो,
अन् सुंदर या जगण्याचा ऱ्हास होतो,
सावरा स्वतःला नका करू तुलना,
तुम्ही योग्य ते करा, गरजेचे ते आणा,
संस्कार जपा समतोल मनाचा ठेवा,
मग कळेल खरे, जन्म कसा जगवा…!!!
— रचना : हेमंत भिडे.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800