उठ मानवा, जागा हो
अन् हो तूच, तुझा मुर्तीकार….
सर्व मानवजातीत, तूच आहेस बुद्धीमान
लढ तुझा तूच, तु सामर्थ्यवान…
डोळयात स्वप्न तुझी, कर त्याची निर्मिती
वर्तमान अन् भविष्य घडव, अन् तु कर उन्नती….
ध्येयाचा तु पुतळा, कार्याची उधाण कर
घे हाती कुठलेही काम, अन् संधीचे सोने कर….
उत्तुंग शिखर गाठ तु, उमटव तुझा ठसा
आयुष्यालाही दे उत्तर, चालव मानवतेचा वसा…
हार नको पत्करू, कर प्रयत्नाची पराकाष्ठा
यश तुझेच आहे, ठेव स्वतःवर निष्ठा….
तुझी किंमत तूच कर, अन् हो मौल्यवान
कर ध्येयाचा पाठलाग, अन् हो गतीमान….
आकाशाला गवसण्याची, कर मनी युक्ती
आत्मविश्वासाने उभा हो, दाखव प्रबळ तुझी इच्छाशक्ती…
घडव नशीब तुझे तूच, दे स्वतःला आकार
कारण,
तूच आहेस, तुझ्याच जीवनाचा शिल्पकार …..
– रचना : शिल्पा तगलपल्लेवार, केमॅन आयलँड
Mast
प्रेरणादायी सुंदर कविता