तू आणि मी
आहोत का वेगळे ?
दोघेही आपण
नाण्याच्या दोन बाजू
कधी असते उजवी
तर कधी डावी
कधी असते उघडी
तर कधी झाकलेली
तरी तुझ्या
माझ्यात फरक
कोणी म्हणतो काळी
तर कोणी म्हणतो पांढरी
रंग आपले
दोन टोकाचे
तरी रंगाच्या
बाजारात महत्वाचे
कोणी म्हणे
मदतीस येतो
कोणी म्हणे
निव्वळ विचारतो
कधी सावलीसारखा असतोस
तर कधी शोधूनही मिळत नाहीस
तू आणि मी
आहोत का वेगळे ?
तुझ्याविना मी
माझ्याविना तू
आहोत आधे अधुरे
नाते अपुले मैत्रीचे
नाही केवळ दिवसाचे
ते तर कायम
चिरंतन आयुष्याचे.
– रचना : प्रसाद मोकाशी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🌹सुंदर कविता 🌹
धन्यवाद