शाळेतले दिवस
फुलपांखरावाणी रंगीत
निखळ मैत्री
जीवन होते संगीत
हातात हात मैत्रीचा
स्वच्छंदे बागडलो
नव्हती कसली चिंता
गाढ दोस्तीत रंगलो
एकत्र केला गृहपाठ
स्पर्धा नाही केली
असे ना माझा दुसरा नंबर
मैत्रीणच तर पहिली आली
वय कसे भरभर वाढले
माणसे झाली व्यवहारी
कुठे नफा कुठे तोटा
सारीकडे दुनियादारी
यशाचे शिखर गाठण्यासाठी
एकमेकांचे ओढती पाय
कसली नाती कसली गोती
कसचे काय नं कसचे काय?
ह्याला जीवन ऐसे नाव
धावत आहेत माणसे सारी
हीच असावी का
दिल दोस्ती दुनियादारी ?

– रचना : अरूणा मुल्हेरकर, अमेरिका