Thursday, January 1, 2026
Homeसाहित्यदिव्य वाट

दिव्य वाट

आज मी पुर्ण शुद्धीत आहे
माझ्या तनामनावर कसलीही नशा नाही.
माझ्या आत्म्याचे शुद्धीकरण झाले आहे.
आज त्याच्यावर कसलीही धुंदी नाही ll

दुतर्फा पेटलेयत पलिते कितीतरी,
त्या प्रत्येक हुंडाबळीच्या
पेटलेल्या शरीरांचे वाजतायेत नगारे,
छेडली जातेय वीणा
त्यांच्या धमन्यांवर तार फिरवुन ll

ती बघा बसलीये कोपर्‍यात
शांत अलिप्त,
अंतहीन जगाच्या टोकाचा
वेध घेत.
तिने जन्माला येण्यापूर्वीच
आईच्या पोटातच हा
दिव्य मार्ग निवडला.
कुणातरी पुरुषाने दिलेले
घेतले टोचून इंजेक्शन ll

ती बघा दुधात न्हाल्यासारखी
शुभ्र दिसतेय,
तिच्याच वाडवडिलांनी जन्मास आल्याबरोबर
बुचकाळले उकळत्या दुधात
शुभ्र अंगावर दिसतायेत
लाल ठिपक्यांची नक्षी ll

ती बघा बसलीये गुढघ्यात
मान घालुन नव्हे, समाधी लावुन,
स्वतःच्या चुका आठवण्याचा
करतेय प्रयत्न,
बागडताहेत तिचे चिमुरडे,
पण घाबरतायेत घ्यायला
तिच्याच अन्नाचे घास, विहिरीच्या पवित्र पाण्याला
जवळ करून, केली स्वतःची सुटका
नवरा आणि सासुपासुन ll

ती बघा, तिने जखडले स्वतःला झाडाला
त्यांच्या जाचातुन सुटका करण्याच्या
प्रयत्नात पकडली गेली ती,
नंतर तन, मन, नव्हे तर
आत्माच घेऊन बाहेर सुटली ll

हे काय ? कुठे आहेत
तिचे हात, पाय, डोके ?
समोर हिरवळीवर सगळे मांडलेयत,
‘ती बघतेय शुन्य नजरेने त्यांच्याकडे घाबरतेय हिरव्या रंगाला अन
हातातल्या खाटीक सुर्‍याला ll

आई, बाबा, दादा, ती टाहो फोडतेय,
पण टाहोसाठी तुकडा शोधतेय जीभेचा
कुठल्यातरी श्वापदाच्या घशात
जो गुरगुरतोय त्याच जीभेने,

डोक्यापासून ते पायापर्यंत
गारठलेलाय प्रत्येक तुकडा
हिमाच्छादित पेटीमध्ये,
तिच्याच तोडलेल्या हातांना
शोधतेय ती,
ते पण हात भाळी मळवट भरण्यासाठी ll

आता मागे वळुन बघायलाच हवे
अरे ! किती मोठा लोंढा हा
कसे हाकलेय त्यांना या वाटेवर !
अरेरे ! तन, मन नव्हे तर
आत्माहिन बिचाऱ्या
शरीरावरचे लंपट डाग
पुसण्यासाठी त्यांचा
समाजच त्यांना नकार देतोय.
आणि
ढकलल्या, झोकल्या
जातात या दिव्य वाटेवर …ll

सुजाता येवले
  • — रचना : सुजाता येवले.
    — संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
RELATED ARTICLES

27 COMMENTS

  1. स्त्रीची व्यथा, अवस्था आणि अस्वस्थता नेमक्या शब्दांत मांडली आहेत.

  2. स्त्री जीवनाचे वास्तव अतिशय समर्पक शब्दात मांडले कवितेत.. सुंदर..

  3. स्त्री जीवनाचा ठाव घेणारी अर्थपूर्ण आणि प्रवाही कविता.

  4. खूप छान कविता, वास्तव वादी, आणि काळजाला भिडणारी. उत्तम लेखन.

  5. हुंडा बळी व स्री व्यथा खूप समर्पक मांडली

  6. अप्रतिम वास्तव वर्णन बारीक बारीक गोष्टीचे अप्रतिम पणे वर्णन केले आहे कविता वाचताना डोळ्यासमोर वास्तविक चित्र उभे राहते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”