नमस्कार, मंडळी.
रेडिओ विश्वास या इंटरनेट रेडिओ वर आपल्या वेबपोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांची सुप्रसिद्ध संवादक मेघना साने यांनी घेतलेली मुलाखत खूपच प्रेरणादायी आहे, अश्या प्रतिक्रिया अनेक श्रोत्यांनी व्यक्त केल्या.
दहावीत नापास होऊन, शिक्षणात खंड पडूनही निराश, नाउमेद न होता पुढे पडेल ती कामं करत त्यांनी कसं शिक्षण पूर्ण केले, उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेत कसं यश मिळविले हा त्यांचा जीवन संघर्ष श्रोत्यांना भावून गेला. अर्थात मेघना साने यांचे, त्यांना बोलतं करण्याच्या यशात मोठाच सहभाग आहे, हे खरंच
प्राप्त झालेल्या प्रतिक्रियांपैकी निवडक प्रतिक्रिया पुढे देत आहोत.
रेडिओ विश्वास, मेघना साने आणि सर्व श्रीत्यांना मनःपूर्वक धन्यवाद.
आपली
टीम एन एस टी
निवडक प्रतिक्रिया
माननीय देवेंद्र भुजबळ सरांच्या मुलाखतीतून अनेक गोष्टी अचूक समजण्यात खूपच मदत झाली. सुरवातीलाच दहावी नापासचा शिक्का बसूनही त्यांनी हार मानली नाही. जेव्हा कळाले की शिक्षणावाचून पर्याय नाही तेव्हा त्यांनी ज्या उमेदीने आणि अडचणींचे डोंगर पार करूनही कित्येक पदव्या पदरी पाडून घेतल्या, त्यामुळे मन खंबीर आणि निग्रही बनण्यास फार मदत झाली आणि एवढे करूनही इतक्या सर्व ठिकाणांहून नोकरीचे कॉल येऊनही ते म्हणतात त्याप्रमाणे स्वार्थ आणि परमार्थ दोन्हींचा उचित मेळ साधून आपल्याला योग्य वाटेल अशीच निवड केली. शिक्षण घेणे त्यांनी कुठेच थांबवले नाही आणि कित्येक नवनवीन उपक्रम सरकारी धोरणांमध्ये राहूनही यशस्वीरीत्या पार पाडले आणि अजूनही त्यांची ही धोरणात्मक घोडदौड वेगाने चालू आहे. नवनवीन कलाकारांना, वक्त्याना, लेखकांना यशाची दारे उघडून देण्याचे खूप महत्त्वपूर्ण आणि सामाजिक कार्य ते आपल्या Newsstorytoday या वेब पोर्टल सोशल मीडिया च्या माध्यमातून करत आहेतच. पत्रकार, लेखक, संपादक, निर्माता, मुलाखतकार, अश्या त्यांच्या या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
– मानसी लाड, मुंबई.
आदरणीय श्री देवेंद्र भुजबळ यांची ‘रेडिओ विश्वास’ मधील प्रेरणादायी मुलाखत ऐकायचे भाग्य लाभले. जीवनातील अनेक संघर्ष त्यांनी उत्तम किवां त्याचा उहापोह न करता यशस्वी पणे पार केला. वेगवेगळ्या श्रेत्रातून त्यांनी अनेक लोकोपयोगी महत्व काम केले. मेहनत व विश्वास या जोरावर माणूस उच्च पदांवर काम करू शकतो. प्रत्येकात स्वार्थ व परमार्थ असला पाहिजे. वेब पोर्टल मुळे बारिक सारीक गोष्टी, काही समाजोपयोगी व्यक्तीची ओळख जगाला होते व खूप माहिती मिळते. तुमच्या प्रत्येक कार्याला यश लाभो.
समाजाचे ऋण असतात ते फेडायचे असतात. याची जाणीव आम्हास करून दिली. आनंदात जगा आणि जगू द्या. हा मोलाचा सल्ला दिला.
श्री देवेंद्र भूजबळांचा परिचय करून दिल्याबद्दल ‘रेडिओ विश्वास’ चे आभार.
धन्यवाद 🙏
– पूर्णिमा शेंडे
सर जयभीम.
सर मी रेडिओ विश्वास वरील आज प्रसारित झालेला कार्यक्रम मन लावून ऐकला.
आपला संघर्ष, आपली सृजनशीलता ,आपली निर्णय क्षमता या गोष्टी नविन पिढीला प्रेरणा देणाऱ्या आहेत. करण्यासारखे खूप काही आहे
याची जाणीव प्रकर्षाने होते.जे काम आपण करतो ती एक देश सेवा आहे ही भावना यातून समजते.समर्पण या शब्दाचा खरा अर्थ कळतो.
धन्यवाद साहेब, आभारी आहे. 🙏
– अशोक केरू गोरे.
नमस्कार सर 🙏 तुमची मुलाखत आत्ताच ऐकली….. स्ट्रगल या शब्दाचा नेमका अर्थ समजला आणि सरकारी नियमांच्या चौकटीत राहून सुद्धा काम करता येतं हा आदर्श वस्तुपाठ स्वतःच्या कृतीतून तुम्ही घालून दिला आहे. तरूणांना नक्कीच ही मुलाखत प्रेरणादायी ठरेल….. धन्यवाद 🙏
– विकास भावे, ठाणे.
मुलाखत एकदम छान झाली, सर. स्वार्थ आणि परमार्थ पटलं. तुम्ही अकोल्याला होतात सर. पिंपळखरे सर न्युईरा मधे होते. मावशीचे यजमान.
– वर्षा फाटक, पुणे.
खुपच प्रेरणादायी मुलाखत 💐
– सोमनाथ साखरे, निवृत्त उपमहासंचालक
एम टी एन एल
मुलाखत ऐकली. उत्तम झाली. मुलाखतीमधून खुप शिकण्यासारखे आहे.
– धनश्री पालांडे, संपादक, रत्नभूमी, रत्नागिरी.
मेघनाताई,
सप्रेम नमस्कार.
आज दुपारी बरोबर एक वाजायच्या आधीच पाच मिनिटे
श्री देवेंद्रजी भुजबळ यांची तुम्ही मुलाखत घेणार म्हणून जय्यत करून बसलो होतो.
वास्तविक अपरिचित व्यक्तीची मुलाखत घेताना फारसे
दडपण नसते परंतु समोरच्या परीचीत व्यक्तींची मुलाखत घेताना प्रचंड दडपण असते. असो….
परंतु आज मात्र मुलाखत घेणारी आणि देणारे दोन्ही दिल
खुलास मूड मध्ये होते. जवळजवळ पन्नास ते पंचावन्न वर्षांचा कालखंड फक्त ३५ मिनिटात हजारो श्रोत्यांच्या समोर उलगडायला लावून नायकाच्या जीवन संघर्षाचे चित्रच कागदावर रेखाटायचे काम सोपे नव्हते पण तुम्ही हे आव्हान स्वीकारले आणि लीलया पेललेही.
श्री देवेंद्रजीनीही कोणताही आडपडदा न ठेवता प्रत्येक
प्रश्नाला सत्य आणि सत्यच उत्तर दिले. कोणतीही लाज न बाळगता जे घडले, जसे घडले तसे तसे प्रांजलपणे कथन केले.
वेळोवेळी त्यांनी घेतलेला निर्णय, मग तो शिक्षणाच्या
बाबतीत वा एक नोकरी सोडून दुसरी स्वीकारताना कधीच चुकला नाही याला कारण प्रत्येक निर्णय साधकबाधक विचार करूनच घेतला.
निर्णय चुकला म्हणून खन्त करायची वेळ आली नाही.
आपण कोण आहोत, कुटुंब सदस्य म्हणुन आपली जबाबदारी काय याचे कायम भान ठेवले. दुर्दैव असे की जीवन संघर्ष करणार्या अशा व्यकतीची नोंद प्रसार माध्यमे फारशी घेत नाहीत पण तुम्ही मात्र त्याला अपवाद ठरला.
अजून फक्त दहा मिनिटे वाढवून मिळाली असती तर संघर्षावर अधिक प्रकाश पडला असता.
काळजी घ्या, करू नका.
– प्रकाश पळशीकर, नोएडा
भुजबळ सर,
अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण मुलाखत होती. वेगवेगळ्या अनुभवांची शिदोरी घेऊन सरकारी माध्यमातून केलेलं कार्य कौतुकास्पद आहे.
मेघना ताई, आपण नेहमी प्रमाणे योग्य प्रश्न विचारून समोरच्याला छान बोलतं करता. सुंदर मुलाखत.👌👌
– स्वाती गोखले, पुणे
काही कारणास्तव दि. 18/7/2021 रोजी श्री, देवेंद्र भुजबळ साहेब यांची रेडिओ विश्वास या इंटरनेट चॅनल वर लाईव्ह प्रसारित झालेली मुलाखत ऐकू शकलो नव्हतो. परंतु त्यांच्या पत्नी सौ अलका भुजबळ यांच्या सहकार्याने प्रसारित झालेली ऑडिओ मुलाखत ऐकण्याची संधी प्राप्त झाली. त्याबद्दल मी त्यांचा 🙏आभारी आहे.
खरेच श्री देवेंद्र भुजबळ साहेब यांनी गरीब परिस्थिला कोणालाही जबाबदार न धरता, गरीब परिस्थिचे रडगाणे न गाता मिळेल ते काम करून प्रतिकूल परीस्थीवर मात केली व जीवनात यशस्वी झाले. दहावी नापास झालेला विद्यार्थी मनात एखादी खूणगाठ बांधली तर सरकारी नोकरीं मध्ये उच्च पदा भूषवू शकतो हे दाखवून दिले.त्यांची मुलाखत ऐकून आजच्या तरुण पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल. श्री. देवेंद्र भुजबळ साहेब यांना पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा 🌹
सन्माननीय देवेंद्र भुजबळ साहेब यांची विश्वास रेडिओ स्टेशन ९०.८ वर प्रसारित करण्यात आलेली व मेघना साने मॅडम नी घेतलेली मुलाखत अप्रतिम विचाराने ओतप्रोत भरलेली होती आणि ती आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी असून तरूणांनी एखाद्या वळनावरच्या अपयशामुळे न खचता ते एक आव्हान स्विकारून पुढे चालत राहण्यासाठी प्रेरणादायी असा साहेबाचा जीवन प्रवास आहे.
म्हणूनच मनावेसे वाटते की, जर तरूणांनी आपल्या स्वप्नांची नवी दिशा ठरवून आपले इप्सित साध्य करण्यासाठी प्रयत्न केले तर ते नक्कीच यशवंत होऊ शकतात हे भुजबळ साहेबांच्या उदाहरणावरून स्पष्ट दिसून येते.
साहेब आपले मनःपूर्वक अभिनंदन !!
आपला स्नेहांकित,
राजाराम जाधव,
उलवे नवी मुंबई