Wednesday, March 12, 2025
Homeलेखदेव मासा आणि देव माणसं

देव मासा आणि देव माणसं

समुद्रावर गेले की लहानपणी सर्वच मुलं शंख, शिंपले जमवतात. . काही मोठी माणसं पण जमवतात. काही वेगळ्या रंगाची वाळू असेल तर आणतात. कधी जेली फिश, खेकडे, मासेही पकडतात. सामान्य माणसं इतकंच करतात !

पण आपल्या सारखाच एक सामान्य माणूस आणि त्याचे कुटूंब, देवमाशाचा सापळा घरी आणतात, जपतात, इतरांना दाखवण्यासाठी छोटे म्युझियम आपल्या अलिबाग जवळील चौलच्या वाडीत ‘ब्ल्यु व्हेल इको टूरिझम सेंटर’ उभारतात हे मी प्रथमच पहात होते.

श्री सतीश कोळवणकर आणि त्यांच्या पत्नी सौ. शितल ताई, व दोन्ही मुली, या कुटुंबानी घेतलेल्या ह्या परिश्रमाचे, मला खूपच कौतुक वाटले. ते पर्यावरण प्रेमी आहेत. कचऱ्यापासून खत करण्यासाठी त्यांनी स्वतः च्या इमारतीत प्रयोग करून अनेकांना मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

श्री .सतीश व सौ. शितल कोळवणकर

ते शहरी शेतीचे पुरस्कर्ते आहेत. वृक्षप्रेमी आहेत. पक्ष्यांसाठी घरात त्यांनी अनेक गोष्टी ठेवल्या आहेत. अनेक पक्षी त्यांच्या घरात आहेत, ते अंबिका कुटीरचे कार्यकर्ते असून अनेक ठिकाणी योगाभ्यास शिकवतात. रेन हार्वेस्टींग करून पाणी वाचवतात. हे सर्व मला माहित होते.

पण देवमासा ?……..
तो कसा जपला आणि देवमाशाबद्दलची सर्व माहिती त्यांनी सामान्यांना समजण्यासाठी, वाचण्यासाठी, मोठे फलक करून (मराठी आणि इंग्रजीत) ठेवली आहे.

पर्यावरण वाचवण्यासाठी आपण काय करतो हे प्रत्येकानी स्वतः ला विचारावे आणि ह्या कुटुंबाचा आदर्श समोर ठेऊन, यथाशक्ती प्रयत्न करावे, तरच जे जगावेगळी कामं करतात, त्यांच्या कामाला न्याय मिळेल.

अलिबाग ला कधी गेलात तर जरूर भेट द्या ‘ब्ल्यु व्हेल इको टूरिझम सेंटर’ ला.

— लेखन : चित्रा मेहेंदळे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित
सौ.मिनल शशिकांत शिंदे, on चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम