Sunday, February 1, 2026
Homeसाहित्यनदी वाहे निरंतर...

नदी वाहे निरंतर…

नदी वाहे निरंतर
काठी प्रवाही अंतर
थोडे सुख थोडे दुख
मनी यादेचे मंतर.
नदी वाहे निरंतर….

मनी नदीच्या कल्लोळ
पाणी वाहे झुळ झुळं
ताडमाड पानोपानी
त्यांना लागले हे खूळ
असे भरले अंतर..
नदी वाहे निरंतर…

काही गूढ तिच्या गात्री
काही दिस काही रात्री
गूज रुजते मनात
रंगवते मनी चित्री
रूप पाहते अंबर…
नदी वाहे निरंतर….

कधी सागरा समीप
कधी चांदण्याचे दीप
कधी सुसाट लहर
कधीं भैरवी ती गात
जपे यौवनी बहर…
नदी वाहे निरंतर..

सुख दुःखाचा पसारा
काठ किनारा आसरा
मूक नयनात पाणी
भिने देहामध्ये वारा
दान जलाचे सुंदर
नदी वाहे निरंतर…

अनुपमा मुंजे

– रचना : अनुपमा मुंजे. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Anil Deodhar on झेप : 9
Vinod Ganatra on झेप : 9