डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ‘गर्जे मराठी’सोबत सामंजस्य करार
औरंगाबाद, दि.१० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व अमेरिका स्थित ‘गर्जे मराठी’
यांच्यात सामंजस्य करार करार करण्यात आला आहे. जागतिक पातळीवर कार्यरत उद्योजक, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचा समावेश असलेल्या या सेवाभावी संस्थेच्या वतीने नवउद्योजकांना संधी उपलब्ध झाली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘एआयसी-बामू फाऊंडेशन‘ व ‘गर्जे मराठी‘ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टार्टअप अॅक्सलेटर प्रोग्राम‘ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहोत. या संदर्भात माहिती देण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी ऑनलाईन पत्रकार परिषद घेण्यात आली.
‘गर्जे मराठी‘चे अध्यक्ष आनंद गाणू व सुधीर कदम (सॅनफ्रान्सिस्को,अमेरिका) तर अलंकार जोशी (सिंगापूर) यांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यपीठाचे प्रकुलगुरु डॉ शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, संयोजक डॉ.सचिन देशमुख, संयोजक संजय शिंदे आदी उपस्थित होते.
‘गर्जे मराठी ग्लोबल इनोव्हेशन अकॅडेमी’ या जागतिक पातळीवर कार्यरत यशस्वी मराठी उद्योजक, व्यावसायिक, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचा समावेश असलेल्या सेवाभावी संस्थेच्या वतीने मराठी नवउद्योजकांना झेप घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
मराठवाडयातील विद्यार्थी, संशोधक यांच्यात मोठी क्षमता असून त्यांना योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही कुलगुरुंनी यावेळी बोलताना दिली.
या माध्यमातून आता ‘सिलिकॉन व्हॅली’च्या धर्तीवर नवउद्योजकांसाठी सोळा आठवड्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम निःशुल्क उपलब्ध करण्यात आला आहे, असे सुधीर कदम म्हणाले. ‘गर्जे मराठी ग्लोबल इनोव्हेशन अकॅडेमी’ द्वारे पुरविल्या जाणाऱ्या सर्व सेवा निशुल्क असतील आणि संस्था कुणाकडूनही कसल्याही प्रकारे आर्थिक शुल्क घेत नाही. संस्थेचे संस्थापक आनंद गानू असून, या प्रकल्पाचे संचालन अलंकार जोशी आणि सुधीर कदम करीत आहेत.
नवउद्योजकांसाठी आयोजित या अत्यंत उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थेमध्ये विविध देशांमध्ये कार्यरत अनेक यशस्वी महाराष्ट्रीयन उद्योजक, अनुभवी व्यावसायिक, तज्ज्ञ प्रशिक्षक आदींचा समावेश आहे.
नवोन्मेषी उद्योजकांना जागतिक पातळीवर सक्षमपणे उभे करण्यासाठी ‘गर्जे मराठी ग्लोबल’ चे हे पाऊल नवनवीन वाटा दाखवतील, नवनवीन विचारांशी परिचय करवून देतील, उच्च दर्जा प्राप्तीसाठीच्या दिशा, प्रयत्न याबाबत मार्गदर्शन करतील. ‘मॅजिक’च्या माध्यमातून नवउद्योजकांना मार्गदर्शन करणाऱ्या निष्णात मार्गदर्शकांचाही यात सहभाग असणार आहे.
नवीन उद्योजकांसाठी आयोजित या सोळा आठवड्यांच्या प्रशिक्षणामध्ये उद्योगाच्या प्रारंभीच्या काळात आवश्यक दृष्टिकोन, साधने आणि कौशल्य याबाबत मार्गदर्शन केले जाईल. यात सहभागींना हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आपली अंगभूत कौशल्ये अधिक विकसित करून ती आपल्या गुंतणूकदारांसमोर सादर करता येतील. आपला उद्योग सुरु करताना, विकसित करताना आणि विस्तार करताना येथील प्रशिक्षकांचे नियमित मार्गदर्शन घेता येईल.
या प्रशिक्षणादरम्यान यात सहभागींना येणाऱ्या अडचणी, अनुभव हे सर्वच प्रशिक्षकांसमोर दर आठवड्याला सादर केले जाईल. यासाठी उद्योग नुकताच सुरु झालेला हवा, उद्योगात परदेशी गुंतवणूक किंवा उद्योजकाची स्वतःची गुंतवणूक हवी. यात सहभागाकरिता — https://forms.gle/jf5kPEuyaJ8yZLxw6 या वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करावा आणि पूर्ण भरलेला फॉर्म उपलोड करावा, अशी माहिती आनंद गाणू यांनी दिली.
पात्र उद्योग आणि उद्योजकांनी यात सहभाग घेऊन जागतिक पातळीवरील अत्युच्च दर्जाचे प्रशिक्षण, मार्गदर्शन प्राप्त करावे आणि उत्तुंग यशाला गवसणी घालावी, असे आवाहन संस्थापक आनंद गानू व अलंकार जोशी यांनी केल.
सात नवउद्योजकांना सहकार्य
या करारांतर्गत आतापर्यंत महेश शेळके, डॉ.वैशाली इंगळे व कृष्णा जाधव यांना सहकार्य केले आहे. तर लवकरच सुरेश सोरमारे (सेहत इझी), सागर इंगळे (किक स्टँड टेक्नॉलॉजी), योगेश गावंडे (नियो इंजिनिअर्स) व स्वप्नील कालरा (द फार्म फुड) यांना सहकार्य करण्यात येणार आहे, अशी माहिती बजाज इन्क्युबूशन सेंटरचे संचालक डॉ. सचिन देशमुख यांनी दिली. पत्रकार परिषदेस निवृत्त आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर, उद्योजक अशिष गर्दे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800
नव उद्योजकांना संधी हा लेख तरुणांना स्फूर्ती देणारा आहे.अगदि. आंतरराष्ट्रीय पातळीवर मदत. मिळाली तर आजचा तरुण नक्कीच उत्तू गं यशाला गवसणी घातल्याशिवाय राहणार नाही.
अतिशय उपयुक्त माहिती.
अतिशय सुंदर लेख वाचायला मिळतात.
संपादक देवेंद्र भुजबळ यांचे अभिनंदन