नवरात्रीची नऊ रूपे तू
ओजस प्रज्ञावंत तू..
दुर्गा माते तुझीच रूपे
दिससी मज चहूकडे तू..
आई तू ग, आजी तू..
अथांग प्रीतीचा सागर तू..
मावशी तू अन आत्या तू
संस्कार मजवरी केले तू..
काकू तू ग, मामी तू..
परक्या घरचं धन तू
माहेरची ग लक्ष्मी तू..
अन आजोळची अन्नपूर्णा तू..
सखी तू सहचारिणी तू
दोन्ही घरचा आत्मा तू
लेक-सून, माता-कन्या
दशावतारी रूपे तू..
सासू तू ग नणंद तू..
जाणूनि मज घेतले तू
मैत्रिणीसम जाऊ तू
सासर प्रिय केले तू..
रेणूका तू ग काली तू
सरस्वती, भवानी तू
तुजविन मी अधूरि ग..
वंदन तुजला करते ग..

– रचना : डॅा. मीना बर्दापूरकर. ठाणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
छान आहे कविता….चालीत म्हणता येते आहे