१. आशिर्वाद आई देवी मातेचा
दे आई मजला आशिर्वाद
मी भक्त घालीतो तुजला साद
हे आई…. हे आई….
हे आई…. हे आई….
तुझ्या कृपेची असो सावली
तू तर साऱ्या विश्वाची माऊली
तुझ्या कृपेची असू दे छाया
भक्ती माझी जाई ना वाया
तुझी पूजा आराधना करीन
तुझ्या भक्तीत होईन मी लीन
आई माझ्या नवसाला पाव गं
संकटात भक्ताघरी धाव गं
उद्धार कर तू माझ्या कुळाचा
भरीन ओटी वान खण नारळाचा
नमन करतो दे वरदान आम्हाला
प्रसादाला श्रीफळ पेढे नैवेद्याला
तू अंबा तू जगदंबा तू भवानी तू चंडिका
तू दुर्गा अन् तू कालिका तू एकविरा तू रेणूका
तू सप्तश्रृंगी तूच कात्यायनी
महिषासूरमर्दिनी तूच दैत्यासूर नाशिनी
तू महालक्ष्मी तूच महाकाली
तू महासरस्वती तूच कुलस्वामिनी
अनेक रुपे घेऊन आली
भक्तांना तू तारूण गेली
आलो शरण मी तुजला माते
दे कृपाशीर्वाद तुझ्या वरदहस्ते
दे आई मजला आशिर्वाद
मी भक्त घालितो तुजला साद
हे आई…. हे आई….
हे आई…. हे आई….
— रचना : चंद्रशेखर कासार. धुळे
२. अंबा भवानी
होसी प्रसन्न प्रसन्न आपुल्या भक्तावर,
नाव घेईन घेईन, ते रूप तुझे सुंदर,
आई कृपा करी, कृपा करी, आता माझ्यावर,
तुज विनवतो, विनवतो, धर हाती हा कर,
तेज फाकले, फाकले, चैतन्याचे पाही,
तुज नैवेद्य, फराळ, फळ, पक्वान्ने देई,
होता कृपा तुझी, कृपा तुझी, होते नवलाई,
कार्य अवघड, अवघड, जुळून येते पाही,
काय वर्णावी, वर्णावी, मुखमंडल तव शोभा,
दिव्य प्रकाश, प्रकाश, सौंदर्याची आभा,
हास्य मोहक, मोहक, शस्त्रांसहित अंबा,
भय आसुरा, दानवा, भक्त आनंदी उभा,
नवरात्रीत, नवरात्रीत, करीन जागरण,
तव पूजन, अर्चन, गायन मी करीन,
होता प्रसन्न तू, प्रसन्न तू, पंचारती ओवाळीन,
जन्म सफल, सफल, समाधानी होईन…!!!
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
३. देवी स्तवन
माते कर्दनाचा काळ असे
शत्रू संहारक नाम तुझे
आले शरण तुझिया चरणी
मनोकामना गे पूर्ण होतसे..
कलीयुगी तू घेशी अवतार
भक्त रक्षणा येशी सत्वर
सकलांना करिसी निर्भर
महिमा तुझा जगी चराचर..
नऊ दिवस अन नऊ रात्री
उत्सव अर्चना नित्य होतसे
सर्वत्र हर्षे आनंद पसरतसे
भक्तजन मोदे होती गात्री..
शक्तीमय कुंडलीनी असे तू
मुलाधार चक्रे वासिनी तू
सप्त चक्राना गे भेदीसी तू
सळसळशी प्राणातुनी तू..
— रचना : सौ.मीना घोडविंदे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.