Saturday, November 23, 2024
Homeसाहित्यनारदाचे गर्वहरण

नारदाचे गर्वहरण

मोरपीस १

देवश्री नारद गायनात होते तल्लीन
त्रिलोकी त्यांचा संचार वीणाची घेऊन  साथ
आले मूत्यूलोकी भारावून लागले गाऊ
खळखळती नदी, नयन रम्य निसर्ग

गायन ऐकून जंगलातले प्राणी झाले गोळा
शेळी शेजारी वाघ, हरिण शेजारी  सिंह,
सापाजवळ मूगूंस, वैरभाव सर्व विसरून
झाले गायन ऐकण्यात दंग

संपले गायन नारदमूनीचे
डोळे उघडून पाहिले अद्भभूत दृश्य
शत्रुत्व सोडून सर्व प्राणी एकत्र
नारदाला झाला अति गर्व

स्वतःचीच स्तुती सागंत फिरू लागले सर्वत्र
विष्णू भगवंताना सांगी वारंवार
अद्भभूत गायनाचा हा प्रकार
भगवंत जाणले नारदाला झाला गर्व

नेले त्याला मृत्यूमुखी
दाखवली एक वीणा
अर्धवट रुतलेली एका खडकात
वाईट वाटले नारदाला

श्री विष्णू म्हणाले
एक भोळा माझा भक्त
गायन करत होता मस्त
सुंदर गायन ऐकून

खडक विरघळत गेला पार
पाण्यात विरघळून खडक
भक्त ही बुडाला पाण्यात
वीणा अडकली खडकात

गायन संपले तालात
खडक झाला पूर्ववत
भक्त  आणि वीणा
अडकले अर्धवट

श्री विष्णू विचारी नारदाला
उत्तर दे मजला..

सजीवांना एकत्र आणणारे
गायन मोठे कि
निर्जीव खडकाला पाझर फुटणारे
गायन मोठे?

नारदमुनी समजायचे ते समजले
श्री विष्णूचे करत नामस्मरण
नारदमूनीचे झाले गर्वहरण

– रचना : पूर्णिमा शेंडे

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments