मी शब्दातुनी, श्वासातुनी
दु:ख युगाचे गात आहे ||
पहाट प्रहरी तारेवरती
पक्षी दोहे छेडत आहे ।
किरणांतुनी, कवडशातुनी
सूर्य कूस बदलत आहे ।
खळखळणारी नदी थांबली
सळसळणारी वीज गोठली
प्रपातुनी, आघातातुनी
लय विलयाची जात आहे ।
मुरक्यांच्या दाबल्या मुसक्या
कोंदणात कोंडल्या मूर्त्या
मी स्वरातुनी, तालातुनी
घेतली मुकीच तान आहे ।

– रचना : सुधीर शालीनी ब्रह्मे.
वा,एका कवींची दुसऱ्या कवीला दाद ,अप्रतिम !☺️
अप्रतिम 👌🏻👌🏻