मिणमिणते पणती
देवळाच्या देव्हाऱ्यात
कसा देव्हारा उजळतो
राती मंद प्रकाशात !१!
तेल समईतला जणू
दिले सोताला अर्पूण
वात कापसाला सांगे
धन्य झाले तुझे जीवन !२!
वारा मंदमंद वाहे
तसे सांगे सारी रात
पारिजातकाचा सुवास
भरला सारा आसमंत !३!
टपो-या चांदण्यात
चंद्र कसा शोभतो नभात
ढगाबाहेर डोकावता
चांदण्याला वाटे आनंद !४!
रात्र ओलांडून जाता
मंद झालाय तो शशी
लुकलुकणा-या चांदण्या
जणू वाटती उपाशी !५!
जणू वाटती उपाशी !!

— रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
