Monday, March 9, 2026
Homeसेवापांचगणी : ‘शून्य कचरा परिसर’ अभियान सुरु

पांचगणी : ‘शून्य कचरा परिसर’ अभियान सुरु

नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ अंमलबजावणीसाठी शाळा व हॉटेल्सना मार्गदर्शन

पांचगणी गिरिस्थान नगर परिषद आणि हिलदारीच्या संयुक्त विद्यमाने शून्य कचरा परिसर तसेच नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर नगरपरिषद सभागृहात नुकत्याच एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेचे उद्घाटन नगरपरिषद अध्यक्ष श्री. दिलीप भाऊ बागडे, श्री. शेखर कसुर्डे, आरोग्य सभापती राजश्री सणस तसेच सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. शेखर कसुर्डे यांनी घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करतई शहर स्वच्छ व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिक, शाळा व हॉटेल व्यावसायिकांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे सांगितले. पंचगणीसारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील शहरात कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग देण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात श्री. आशिष वैष्णव यांनी कोरडा व बागेतील कचऱ्यापासून पेललेटिंग तंत्रज्ञानाद्वारे ऊर्जा व उपयुक्त उत्पादने तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात कॅप्टन राहुल (नारी केअर) यांनी सॅनिटरी पॅडमुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांवर प्रकाश टाकत त्यावरील पर्यावरणपूरक उपाय योजनांची माहिती दिली.

हिलदारीचे डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी झिरो वेस्ट कॅम्पस संकल्पनेचे सविस्तर स्पष्टीकरण करत शाळा, हॉटेल्स व इतर संस्थांनी स्त्रोतावर कचरा वर्गीकरण, पुनर्वापर व प्रक्रिया करून कचरा शून्य करण्यासाठी कोणती पावले उचलावीत याबाबत मार्गदर्शन केले. तसेच १ एप्रिल २०२६ पासून लागू होणाऱ्या नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ मधील महत्त्वाच्या तरतुदी व जबाबदाऱ्या यांची माहितीही त्यांनी दिली. झिरो वेस्ट कॅम्पस उपक्रम यशस्वीपणे राबविणाऱ्या संस्थांचा पर्यावरण दिनानिमित्त सन्मान करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

या कार्यशाळेत पांचगणीतील विविध शाळा व हॉटेल्समधील ५० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. सर्व सत्रांना सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक शाळा व हॉटेल्सनी आपले कॅम्पस झिरो वेस्ट करण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली.

पांचगणी गिरिस्थान नगरपरिषदेमार्फत हिलदारीच्या सहकार्याने नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ बाबत जनजागृती करण्यात येत असून मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या घटकांना शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे पांचगणीचे निसर्गसौंदर्य जपत शाश्वत विकास साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमाचे सहभागी शाळा व हॉटेल प्रतिनिधींनी कौतुक करत पांचगणीसारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Pranita Khandkar on संगती रंग : ४
पुरुदत्त रत्नाकर on संगती रंग : ४
Vedvati Kulkarni on झेप : 14
Swati Naik on अभंग : ओढ
मृदुला राजे on ऋतुराज वसंत