पाऊसाची लागताच गाणी
गोड लाजून
हसली माझी राणी
आठवणींचे काहूर दाटले
मन क्षणात भूतकाळात रमले.
अचानक विजांचा कडकडाट झाला
धो धो पाऊस
बरसू लागला
गाडी बंद पडण्याचा बहाना झाला
मित्र मैत्रिणींचा
संपर्क तुटला.
योगायोग असा
काही साधला
एकांतात तिचा
सहवास लाभला
मनाचे उघडले अलगद द्वार
आज पाऊस होता साक्षीदार.
साधी, सरळ आणि भोळी
सगळ्यांपेक्षा ती
अशी वेगळी
पाहून तिच्या
गालावरची कळी
आमच्या प्रेमाची नाळ जुळली.
मैत्रीच्या पलीकडचे आमचे नाते
हृदयाचे ही वाढले
मग ठोके
बहरून आले तिचे रूप
जगण्याला माझ्या मिळाला हुरूप.
पावसाने अद्भुत
किमया केली
आकस्मित भेट घडवुन आणली
हातात घेतला मग तिचा हात
थेट लग्नाची घातली साद.

— रचना : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
छोटी पण सुंदर! . डोळ्यांसमोर अलगद उलघडते.
🤝 tq विद्या
सुरेख रचना.