भरून तर आलंय अगदी भरतो घडा जसा
पण पडतच नाहीए, पाऊस म्हणतो मी
काळशार झालंय, मन कलुषित होतात तशी
पण पडतच नाहीए, पाऊस म्हणतो मी
जीवाची काहिली, घुसमटताहेत मनं तरी
पण पडतच नाहीए, पाऊस म्हणतो मी
ढुंकूनही पहात नाही तो देवांचा इन्द्र जरी
पण पडतच नाहीए, पाऊस म्हणतो मी
वेधशाळा देते अंदाज येणार पर्जन्य जरी
पण पडतच नाहीए, पाऊस म्हणतो मी
किती वाट पहावी जनतेने आता तरी
पण पडतच नाहीए, पाऊस म्हणतो मी
– रचना : राजा जोशी, नाशिक
सुंदर रचना 👌
भावोत्कट पाऊस