पाऊस श्रावणाचा,
रिमझिमणाऱ्या सरींचा
ऊनपावसाच्या लपंडावाचा.
सप्तरंगी कमानिंचा.
सुरेल संगीत अन् गीताचा.
पाऊस श्रावणाचा,
सृष्टीच्या नजाकतीचा.
फुलांवरल्या दव बिंदूचा
सळसळणार्या गवत पातींचा.
मृद्गंध मातीचा हिरव्या उत्सवाचा.

पाऊस श्रावणाचा,
सणांच्या मांदीयाळीचा
व्रत वैकल्याचा
नागाच्या पूजेचा.
श्रीकृष्ण जन्माचा
झिम्मा फुगाड्यांचा,
सांस्कृतिक बधांचा,
संस्कार पालनाचा.

पाऊस श्रावणाचा,
निसर्गाच्या दानाचा
वसुंधरेच्या शृगाराचा,
मखमली गालीच्यांचा
मुक्त नव चैतन्याचा,
असीम आनंदाचा,
हवाहवासा सान थोरांचा

— रचना : मीरा जोशी
— संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800