Saturday, July 5, 2025
Homeसाहित्यपावस व्यथा

पावस व्यथा

कोकणातल्या स्वर्गाक,
वैभवात सजवतय,
हिरव्यागार शालीत,
गावांक वसवतय ।

वाट बगून थकलंय,
जागे आता होश्याल,
पापान घडो भरल्यान,
दोष कोनाक दीश्याल ।

इकासाच्या नावाखाली,
डोंगरांग पोकरतास,
रस्त्यांच्या कामाखाली,
मातयेक खनतास ।

पूल उबारून,
नदयांक उपसतास,
पिलर बांदून,
पानयाक अडवतास ।

सुरंग लावन,
जमनिक हलवतास,
मशनी रुतवन,
धरनीक घुसळतास ।

जंगला तोडून,
माळराना केलास,
निसर्गाक इसरून,
इमारती बांदलास ।

गाडयेंच्या गरदेन,
झाडाझुडपा चिराडली,
तापमान बिगडून,
प्रदूषना वाडली ।

डोंगर दरे पोकरून,
इटंबना केलास,
चिपी तोडून,
नद्यांक पळवलास ।

हऱ्याभऱ्या निसर्गाक,
ईद्रुप केलास,
निसर्गाच्या वैभवाक,
ओरबाडून टाकलास ।

दरवरसाक बरसतय,
निमूट मार्गान जातय,
मानवाच्या अतिरेकान,
वाट माजी शोदतय ।

नायलाज झालो,
वाट चुकली,
अनर्थ घडलो,
गावा बुडली ।

डोंगरांच्या कुशीत,
झाडांक जगवया,
गावातल्या जीवनात,
पावसाक भेटूया ।

वर्षा भाबल.

– रचना : सौ.वर्षा महेंद्र भाबल.

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. अगदी सत्य परिस्तिथी कथन केली, खूप सुंदर कविता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments