Thursday, March 5, 2026
Homeबातम्यापुणे : 'लेखनाचं ग.म.भ.न.' !

पुणे : ‘लेखनाचं ग.म.भ.न.’ !

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे पुण्यातील पत्रकार भवनात लेखनासाठी मार्गदर्शनपर अशा ‘लेखनाचं ग.म.भ.न.’ या लेखन मार्गदर्शन कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत ‘ललितलेखन’ या विषयावर बोलताना ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.राजा दिक्षित म्हणाले, “साहित्याचे ढोबळमानाने दोन प्रकार सांगितले जातात- वैचारिक आणि ललित स्वरूपाचे साहित्य. पण म्हणून ‘ललित साहित्य हे वैचारिक नसते’ असे नसून, ‘ते वैचारिक असते तथापि ; यामध्ये विचारांचा अविष्कार वेगळ्या पध्दतीने केला जातो’. साहित्य हे जीवनवादी असावे. जगातील क्रांतिकारकांचा इतिहास पाहिला तर त्यातील बरेच जण हे साहित्यिक किंवा कवि होते असे दिसून येते.अगदी संशोधन हेही कोरड्या पध्दतीने मांडले गेले तर ते परिणामकारक होत नाही. हे लक्षात घेऊन संशोधनाच्या मुळाशीही लालित्य असावे.

प्रा डॉ राजा दीक्षित मार्गदर्शन करताना….

लालित्यपूर्ण मांडणीतून आपले विचार समाजापर्यंत निलिमा बोरवणकर ‘कथालेखन’ विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाल्या ; कथा ही गोष्टीपेक्षा वेगळी असते.गोष्टीतील अवकाश मोठा असतो. यात कालानुक्रमे घटनांचे वर्णन केले जाते.

गोष्टीत पात्रांचे मनोविश्लेषण कमी असते, त्यात वाचकांना काहीना काही नेमका बोध सांगितला जातो. तर कथेत काळाचं परिमाण नसतं, ती एका बीजाभोवती फिरते, कथा ही दोन बिंदूमधला प्रवास असतो, कथेतील व्यक्तिंची भाषा ही सामाजिक वातावरणानुसार बदलते, मात्र निवेदक हा प्रमाण भाषेतच बोलतो.

निलिमा बोरवणकर ….

श्री. किरण आचार्य यांनी परस्परसंवादी ‘स्तंभलेखन – ब्लाॅगलेखन’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले.

किरण आचार्य…..

अमृता कुलकर्णी यांनी कार्यशाळेची रूपरेषा सांगून प्रभावीपणे सूत्र संचालनही केले.

अमृता कुलकर्णी

या कार्यशाळेस ‘न्युज स्टोरी टुडे’ पोर्टलचे संपादक श्री.देवेंद्र भुजबळ, प्रा डॉ सतीश शिरसाठ यांच्यासह महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले जवळपास पन्नास साहित्यिक सहभागी झाले होते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vedvati Kulkarni on झेप : 14
Swati Naik on अभंग : ओढ
मृदुला राजे on ऋतुराज वसंत
विनित वैद्य on जिचे तिचे आकाश…: ९