नमस्कार मंडळी.
आज जागतिक पुस्तक दिन आहे. आपल्याला पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
या निमित्ताने आपणास कळविण्यास आनंद होतो आहे की, आपल्या पोर्टल वर प्रसिध्द झालेल्या विविध लेख माला आता पुस्तक रुपात प्रसिध्द होत आहेत.
पहिले पुस्तक
सौ वर्षा महेंद्र भाबळ यांचे “जीवनप्रवास” हे गेल्या डिसेंबर महिन्यात मुंबई येथे प्रकाशित झाले.
दुसरे पुस्तक, सौ रश्मी हेडे यांनी लिहिलेल्या यश कथा असलेले, “समाजभूषण २” आज पुणे येथे प्रसिध्द होत आहे.
तिसरे पुस्तक, निवृत्त पोलीस उपअधीक्षक सौ सुनिता कुळकर्णी नाशिककर यांचे, “मी, पोलीस अधिकारी”
छापून तयार असून प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
विविध पुरस्कार प्राप्त, आपले पोर्टल आणि त्यातून आकारास येत असलेले विविध उपक्रम
म्हणजे प्रसार माध्यमातील अभिनव प्रयोग आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपल्या शुभेच्छा, सहकार्य असेच राहू द्या, ही नम्र विनंती.
आजच्या पुस्तक प्रकाशन समारंभ प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ. संपादक. ☎️ 9869484800
न्यूज स्टोरी टुडे पोर्टलने, प्रकाशिका सौ.अलका देवेंद्र भुजबळ यांच्या रूपात नवीन क्षेत्रात घेतलेली झेप, खूप उंचावर जावो !
खूप अभिनंदन अलका !
हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा
आभारी आहे आपण कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद 🤝
Congratulations 🎉 🎉🎉
Tq