Monday, June 16, 2025
Homeसाहित्यपुस्तक परिचय : संचित

पुस्तक परिचय : संचित

लेखिका सौ. भावना अरविंद प्रधान ह्यांची वाचन, मनन, चिंतन आणि नंतर लेखन ही प्रक्रिया सतत सुरू असते. त्यातच त्या अखंड समाजसेवा करत असतात. माणसे वाचत असतात. त्यामुळे त्यांना लेखनाला अनेक विषय मिळतात. त्यांचे “संचित” म्हणजे हे पुस्तक होय.

बहुजन साहित्य धारा ने प्रकाशित केलेल्या या
२४४ पानी पुस्तकात सहा विभागात एकूण ८३ लेख लिहिले आहेत.

धार्मिक विभागात गुरू पुजन, दैवते आणि सामान्य माणूस, शिवथरघळीचे महत्व, मुस्लिम कवीची रामभक्ती, इस्लाम धर्माची तत्वे, हिंदू संस्कृती आणि अरबस्तान इत्यादी १९ लेख आहेत.

संस्कार या भागात प्रसिध्दीपासून दूर, जागर स्त्री शक्तीचा, आनंदी कसे व्हावे, समाजकार्याचा रथ, माझी आई इत्यादी ९ लेख आहेत.

आरोग्य/पर्यावरण/तेल या विभागात संसारात यशस्वी होण्यासाठी, पर्यावरण, मुलांचं मन जपण्यासाठी, सुजाण पालकत्व इत्यादी ३० लेख आहेत.

शिवाजी विभागात शिवाजी महाराजांची लष्करे व किल्ले, महाराजांची धर्मनिरपेक्षता, राजनीती, महाराजांची कर्तव्य व राजस्तुती हे चार लेख आहेत.

आदर्शगांव – उद्योग या विभागात स्वयंरोजगार संधी, लहान उद्योग, आदर्शगांव, स्वतंत्र व्यवसाय सुरू करताना, जनसेवेचे विविध उपक्रम हे पाच लेख आहेत.

ललित या विभागात चांदोमामा, सुंदर बगिचे, श्रावणमासी, सुंदर बगिचे, किरण बेदी व तिहार तुरुंग इत्यादी १६ लेख आहेत.

या एकूण ८३ लहान मोठ्या लेखांव्यतिरीक्त आई, एक क्षण, माझे अश्रू, स्वप्न, क्रूर रात्र, माझे मन, मुंबई बॉम्बस्फोट इत्यादी विषयांवरील अकरा स्वरचित कवितांचा देखील या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.

पुस्तकाला संचित हे नांव कां देण्यात आले ? हे पुस्तकातील सर्व लेख वाचल्यानंतर लक्षात येते. संचित चे दोन तीन अर्थ आहेत त्यापैकी एकत्र केलेला संग्रह हा अर्थ मला अभिप्रेत वाटला. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एका महिलेने विविध रंगाच्या बांगड्या घातलेल्या हाताच्या ओंजळीत फुले आहेत. ही फुलं म्हणजे सौ.भावना अरविंद प्रधान यांच्या लेखणीतून साकारलेली, भावी पिढीला जगण्याचा आदर्श देण्याची क्षमता असलेल्या साहित्यसुमनांची ही ओंजळ म्हणजे विविध विषयांवर लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे.

संचित हे पुस्तक वाचायला घेतले आणि त्याच दरम्यान एक सुंदर सुविचार माझ्या वाचनात आला…
“मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की
शब्दातून संस्काराचा सुगंध दरवळतो……!!”

मला खात्री आहे की सौ. भावना अरविंद प्रधान यांच्या मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असल्याने त्यांच्या शब्दरूपी सुवासिक फुलांचा सुगंध सर्वत्र पसरेल व वाचकांना आकर्षित करेल.

दिलीप गडकरी

– परीक्षण : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments