“निळाईच्या छटा”
वेद विहार च्या लायब्ररीतील एअर व्हाइस मार्शल सूर्यकांत चाफेकर, यांचे “निळाईच्या छटा”, हे अत्यंत सुंदर पुस्तक वाचनात आले. 📘
इंडियन एअर फोर्स च्या खडतर ट्रेनिंग पासून, एअर व्हॉइस मार्शल या उच्च पदावर पोचेपर्यंतचा ३५ वर्षांचा अतिशय रोमहर्षक प्रवास, त्यांनी या पुस्तकात लिहिला आहे. 📖🖋️

लडाखमधील पाक व्याप्त आणि चीन व्याप्त सीमेच्या मधील भागात, अतिशय उंचावर भारतीय लष्कराची काही ठाणी आहेत. 🏔️
तेथे अतिशय लहरी आणि ढगाळ हवामान, अपुरा प्रकाश, अस्पष्ट दृश्यमानता आणि मर्यादित वाहन क्षमता, यामुळे हेलिकॉप्टरने पुरेशी रसद पुरवता येत नाही. 🚁
अतिशय दुर्गम आणि उंच पर्वतावर जायला रस्ता नसल्याने, लष्करी जवान व त्यांची रसद व शस्त्रास्त्रे, खेचरांवरून पोचवण्यासाठी कित्येक मैल व दिवस यांचा अतिशय खडतर प्रवास करावा लागत होता. 🏞️
सूर्यकांत चाफेकर यांनी “दौलत बाग ओल्डी” या लडाख मधील १६७०० फूट उंचीवरील ठाण्यावर, लष्कराचे मालवाहतूक करणारे मोठे विमान उतरवून इतिहास घडवला.

लडाखच्या पठारावरचे हे भारतीय लष्करी ठाणे, हिमालयाच्या कित्येक शिखरांपेक्षा उंचावर आहे. 🛩️
आयुष्यातील इतर अनेक घटनां बरोबरच, हा अतिशय चित्तथरारक अनुभव त्यांनी या पुस्तकात सांगितला आहे.
तिथे कोणत्याही प्रकारची यंत्राचे सहाय्यता नसल्यामुळे, केवळ जवानांच्या अतिशय खडतर कष्टाने माती व खडक फोडून कच्ची एअर स्ट्रीप करायला कित्येक दिवस लागले.
त्या धावपट्टीवर विमानाची चाके फसण्याचा धोका होता. तसेच त्या उंचीवर हवा विरळ असल्यामुळे, विमानाचे इंजिन बंद केले तर परत चालू होत नाही, त्यामुळे विमान उतरले की सर्व सामान व जवान उतरे पर्यंत, इंजिन चालूच ठेवावे लागते. 🏔️🗻⛰️

तसेच भोवताली उंच पहाड, शिखरे व कडे असल्यामुळे विमानाचे लँडिंग व टेकऑफ ४५ अंशाच्या कोनात करावे लागते, जे अतिशय धोकादायक असते. 🛬🛫
ही सर्व जीवावर बेतणारी जोखीम पत्करून, सूर्यकांत चाफेकर यांनी ही मोहीम पार पाडली.
त्यावरून भारतीय लष्कराच्या इतरही काही दुर्गम ठाण्यावर, विमान वाहतूक सुरू झाली.
या अत्युच्च कामगिरीची जगभरातील लष्करी क्षेत्रात दखल घेतली गेली व सूर्यकांत चाफेकर यांना भारत सरकार तर्फे, २००९ साली शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. 🎖️🏵️
अशा भारतीय लष्कर, एअर फोर्स व नेव्ही यातील अनेक सैनिक व अधिकाऱ्यांमुळे आज आपण सुरक्षित व शांततेत जीवन जगत आहोत. 😌
त्यांना मनःपूर्वक सलाम !
🇮🇳 🫡

— परीक्षण : अजित कुलकर्णी. पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800