Saturday, June 14, 2025
Homeसाहित्यपु ल स्मरण

पु ल स्मरण

अष्टपैलू पु ल देशपांडे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांचे हे काव्य मय स्मरण.पु ल देशपांडे यांना विनम्र अभिवादन.
— संपादक

पु ल. तुम्ही का सोडुन गेला ?
कोण ऐकवील आम्हा कथा !
चितळे मास्तर, अंतू बर्वा ?,
हसवित होते आम्हा सर्वा !

चाळ आगळी बटाट्याची,
वरात वाऱ्यावरी निघाली !
व्यक्ती वल्ली, गण गोत, मैत्र,
जिवंत सगळी व्यक्तीचित्र!

अपूर्वाई, पूर्वरंग ही,
सुंदर तुमची प्रवासवाणी !
भक्तीच्या कुशल अभिनयाने,
फुलणारी तुमची फुलराणी !

कोट्याधीश होतात तुम्ही,
हजरजबाबी तुमची जिव्हा !
वुडहाउसचे तुम्ही चाहते,
निखळ विनोदी लेखनगाभा !

सेवाभावी संस्थांमध्ये,
रमले होते तुमचेही मन !
सुनीताताईंच्या साथीने,
धरेवर प्रकटले नंदनवन !

— रचना : सुरेश शेठ. कोथरूड, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?
शितल अहेर on हे असं कां होतं ?
शितल अहेर on पु ल स्मरण
अदिती साळवी...दूरदर्शन.. on माध्यम भूषण डॉ. किरण चित्रे
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यम भूषण डॉ. किरण चित्रे
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on माध्यम भूषण डॉ. किरण चित्रे