रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील आंसपोई येथील २२ जुलै २०२१ रोजी , सद्विचार सार्वजनिक वाचनालयाचे, नुकत्याच आलेल्या महापुरामुळे अतोनात नुकसान झाले. या वाचनालयास मदत म्हणून सार्वजनिक वाचनालय श्रीवर्धनचे अध्यक्ष श्री. मनोज गोगटे यांनी वाचनालयास पुस्तके भेट दिली.
दरम्यान अ. भा. मराठी प्रकाशक संघाने अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या ग्रंथालयांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
या मोठ्या कामासाठी लेखक, प्रकाशक, ग्रंथ विक्रेते यांबरोबरच सर्व जागरूक नागरिकांकडून सहकार्य लागणार आहे. या मदतीसाठी प्रकाशक संघाने काही निकष आखलेले आहेत.
आपली पुस्तक रूपातील मदत शक्यतो प्रत्येकी किमान छापील मूल्य रु. ५०००/- इतक्या पुस्तकांची असावी. यासाठी कमाल मर्यादा नाही. त्यामुळे आपण जास्तीत जास्त पुस्तके मदत देऊ शकता. मदत म्हणून देण्यात येणारी पुस्तके अतिशय सुस्थितीत असावीत. वाळवी लागलेली, ओली किंवा इतर प्रकारे खराब झालेली, जुनी पुस्तके कृपया स्वीकारली जाणार नाहीत. आर्थिक मदत देणाऱ्या मंडळींनी किमान रु. १०००/- ची मदत करावी. कमाल मर्यादा अर्थातच नाही!
आपली आर्थिक व पुस्तक रूपातील मदत मंगळवार दि. १० ऑगस्ट पर्यंत पोहोचेल अशी पाठवावी. आर्थिक मदत आपण प्रकाशक संघाच्या खात्यात भरून रक्कम भरल्याची पोच (पावती/screenshot ) कार्यालयीन कार्यवाह सौ. वीणा पेशवे (९८८१४ ३५६८०) यांना पाठवावी किंवा मेसेजने कळवावे. म्हणजे दप्तरी नोंद घेऊन आपल्याला पोच-पावती पाठवता येईल.
प्रकाशक संघ अनेक ग्रंथालयांना मदत करणार आहे. त्यामुळे लेखक/प्रकाशक/ग्रंथ विक्रेते पुस्तकं पाठवताना एका पुस्तकाच्या एकापेक्षा जास्त प्रतीही (जास्तीतजास्त १०) देऊ शकतात.
अापण संघाच्या पुढील समिती सदस्यांपैकी एकास संपर्क करुन त्यांच्याकडे पुस्तकं पाठवू शकता.
१) श्री अशोक मुळे, मुंबई – ९८२०७ ४८०८१
२) डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, पुणे – ९८५०५ २८२९६
३) श्री विलास पोतदार, नाशिक – ९८९०९ ३३७९०
४) श्री युवराज माळी, जळगाव – ९७६४६ ९४७९७
५)श्री नितीन हिरवे, पुणे – ९७६५५ ५९३२२
किंवा समिती सदस्यांपैकी एकास कळवून आपण थेट पुढील पत्त्यावरही पुस्तकं पाठवू शकता. :-
मे. डायमंड पब्लिकेशन्स
२६४ अनुग्रह अपार्टमेंट,
वर्तक बागेसमोर, ओंकारेश्वर मंदिराजवळ,
शनिवार पेठ, पुणे-४११ ०३०.
भ्रमणध्वनी : ९८८१४७३४१६.
पुस्तकं पाठवण्याची वेळ – स. १० ते दु. २.
पुण्यातील ज्या मंडळींना प्रत्यक्ष येणे शक्य नसेल त्यांच्याकडून पुस्तके आणण्याची व्यवस्था केली आहे. कृपया त्यासाठी सौ. वीणा पेशवे (९८८१४ ३५६८०) यांना मेसेज करावा व समिती सदस्यांपैकी एकास कळवावे. पुस्तकांची पोच दिली जाईल.
आर्थिक मदत जमा करण्यासाठी प्रकाशक संघाच्या खात्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :-
खात्याचे नाव :- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ.
बँक :- बँक ऑफ महाराष्ट्र,
शाखा :- शनिवार पेठ, पुणे.
बचत खाते क्र :- २०१३६९४२७३३
IFSC :- MAHB0000675
तरी वाचन प्रेमीं व्यक्ती व संस्थानी या उदात्त कार्यात हिरीरीने सहभागी व्हावे असे आवाहन प्रकाशक संघाचे प्रमुख कार्यवाह यांनी केले आहे.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800.