दिवाळी सणानिमित्त जोगेश्वरी पोलीस ठाणे हद्दीतील ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत दिवाळी साजरी करून त्यांच्या आयुष्यात आपुलकीचा प्रकाश दरवळत राहो या कल्पनेतून दिवाळी कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री नलावडे सर, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 10, मुंबई यांनी दीप प्रज्वलित करून केली. त्यानंतर उपस्थित जेष्ठ नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच उपस्थित जेष्ठ नागरिक व जोगेश्वरी पोलीस ठाणेतील अधिकारी व अंमलदार यांनी संगीत गायन करून उपस्थितांचे मनोरंजन केले.


जेष्ठ नागरिकांना दिवाळीचा फराळ देऊन झाल्यानंतर चहापानाचा कार्यक्रम झाला.
सदर कार्यक्रमास सहाय्यक पोलीस आयुक्त, मेघवाडी विभाग, मुंबई तसेच जोगेश्वरी पोलीस ठाणेतील सर्व अधिकारी व अंमलदार तसेच अंदाजे 120 जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
— लेखन : रेणुका बुवा. व. पो. नि.,
जोगेश्वरी पोलीस ठाणे, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सैनिकाप्रमाणे पोलिसही समाजाचे रक्षण करतात. यादृष्टीने चांगला उपक्रम.