Saturday, December 21, 2024
Homeसाहित्यपोवाडा : छत्रपती शिवाजी महाराजांचा

पोवाडा : छत्रपती शिवाजी महाराजांचा

जय जय गणराया।जय अंबे माते नमन तुला ।
गाथा माझ्या छत्रपतींची गाया।दे शक्ती मज ठाया ।
अंबेच्या कृपेने जन्मला शिवाजी ।
दुंमदुंमली आकाश वाणी । दादा रं दा दी दी $$ ||१||

जिजाऊनी घडवला राजा हिंदवी स्वराज्यासाठी ।
जमवले मावळे घेतली शपथ। हर हर महादेव ।
वाढला शिवाचा दरारा । बेचैन विजापूरबाच्छा ।
बाच्छा पुसे वजिराला । ये कोन छोकरा
पेश करा समोरी। दादा $$र दी दी $ |२|

सवाई अबदुल्ला बोला।जिता पकडू मै शिवा को”
अफजल तुळजापुरी आला।फोडीली तुळजा बांधिली मसज्जीत ।
भद्रकाली बोलली शिवाजीला।
आला बोकड दारी हात घाल नरड्याला। दादा र$$दा दा ||३||

खानाच्या स्वागता उभारीला हिरे महाल।
अफजल पाहूनी म्हणे,”नाही पाहिला महल औंरग्याकडे” ।
खान गळा भेटीसाठी आतुरला। दिली कडकडूनी भेट राजांसी।
लावली ताकद जिवे मारण्याची।
काढीला खंजिर राजाने खुपसला पोटी।
कोथळा फोडूनी राजा स्वार घोड्यावरी
जय जय राजा छत्रपती माझा। आता न होणे असा।
नमन करीते अंजली शाहिर महाराजा । जी र$ जी र$$

डॉ अंजली सामंत

— रचना : अंजली सामंत. डहाणू, जि.पालघर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments