Saturday, July 5, 2025
Homeबातम्याप्रकाश भंडारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

प्रकाश भंडारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

नगर येथील जेष्ठ छायाचित्रकार, पत्रकार प्रकाश भंडारे यांचे काल निधन झाले. खरं म्हणजे ते गेले काही काळ काही शारीरिक व्याधींनी ग्रस्त होते. पण त्यांच्या उपजत सळसळत्या, जोशपूर्ण स्वभावावर या व्याधीही मात करू शकल्या नाहीत, त्यामुळे आता आतापर्यंत त्यांच्याशी फोनवर बोलत असतानाही ते एव्हढ्यात जातील असे कधी मनात सुध्दा आले नाही. त्यामुळेच त्यांच्या जाण्याचा एकदम धक्काच बसला.

मी नगर मध्येच १९८३ साली कॉलेजमध्ये असताना पत्रकारितेत चंचू प्रवेश केला. तेव्हा प्रकाशरावांशी झालेली ओळख आजपर्यंत टिकून राहिली. त्यांचं वागणं बोलणं ऐसपैस असायचं. स्वतःच्या कामात तत्पर असतानाच ते पत्रकार संघटनांच्या माध्यमातून पत्रकारांच्या भल्यासाठी सतत झटत राहिले.

एव्हढंच नाही तर कुणा सामान्य व्यक्तीला काही गरज आहे हे कळले तरी ते लगेच धावून जात. वेळप्रसंगी एखाद्या उच्च पदस्थ व्यक्तीला फोन करून सांगण्यासही ते मागेपुढे पहात नसत.

एखाद्या व्यक्तीशी त्यांची मैत्री जुळली की ती ते कायम जपत. बरेचदा आपण पदावर असलो की सर्व संबंध राखून असतात आणि पद गेले की तीच माणसं विचारत देखील नाही, असा अनुभव येत असतो. पण प्रकाशराव याला अपवाद होते. कित्येकदा ते सहज म्हणून फोन करून तासभर गप्पा मारत.

मागचेच आमचे बोलणे झाले, त्यावेळी मी त्याना सुचवले होते की, त्यानी गेल्या ५० वर्षात काढलेली छायाचित्रे हा एक मोठा ठेवा आहे, त्याचे योग्य जतन होण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. यासाठी आम्ही भेटायचे देखील ठरविले होते. पण आता त्यांच्या अचानक जाण्याने ही भेट कधीच होणार नाही याचे दुःख मनात कायम राहील. असो….
प्रकाशरावांना भावपूर्ण श्रद्धांजली.

– लेखन : देवेंद्र भुजबळ.
निवृत्त माहिती संचालक. 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. प्रकाशभंडारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली…!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments