Sunday, December 22, 2024
Homeसाहित्यप्रांजली व योगेश बारस्कर लिहितात...

प्रांजली व योगेश बारस्कर लिहितात…

समाजातील गुणी व्यक्ती, समाज उभारणीचे काम करणाऱ्या संस्था, विचार यांना प्रसिद्धीच्या माध्यमातून पाठबळ देण्याचा आपल्या न्युज स्टोरी टुडे पोर्टलचा नेहमीच प्रयत्न असतो.
या पोर्टलवर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या “प्रांजली बारस्कर : नवी झेप” या रश्मी हेडे यांनी लिहिलेल्या यशकथेला मिळत असलेला प्रतिसाद प्रत्यक्ष
यशकथा नायिका, सहायक आयुक्त (कौशल्य विकास) वर्ग १ सौ प्रांजली बारस्कर यांनी व त्यांचे पती श्री योगेश बारस्कर यांनी सविस्तपणे कळविला आहे. तो त्यांच्याच शब्दात पुढे देत आहे. त्यांचे पुनश्च एकदा अभिनंदन व आभार….
– देवेंद्र भुजबळ. संपादक
www. newsstorytoday.com
☎️ 9869484800

प्रिय रश्मी ताई व आदरणीय भुजबळ सर…सर्व प्रथम आपण सुरू केलेल्या या समाजविकासपुरक चळवळी बद्दल आपले मनःपुर्वक अभिनंदन..! आपल्या या कार्याद्वारे तळागाळातील हिरे शोधून आपण त्यास योग्य कोंदण प्राप्त करून देत आहात. सोबतच आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या जीवन प्रवासालाही अलौकिक रूप प्रदान करता. या साठी तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

आज आपल्या न्यूज स्टोरीच्या माध्यमातून माझा जीवन प्रवास अनेक देशापर्यंत जावून पोचला. यासाठी आपणा दोघांचेही खूप खूप आभार.

सदर लेख वाचून कित्येक फोन कॅाल्स…मेसेज्..आलेत ज्यामुळे मी खूप भारावून गेले.

सुरूवातीला आयुष्यातील वैयक्तीक माहिती अशी पब्लीश करण्याकरिता मन तयार होत नव्हतं. कारण सुरवातीपासूनच आपल्या दू:खाचा पसारा दाखवणे पटत नव्हते. पण मग बऱ्याच व्यक्तींनी समजावले की हा प्रवास जगासमोर आला पाहिजे. यातून कित्येकांना प्रेरणा मिळेल. आणि मग @Swapnil Sahare यांच्या @yes factor च्या माध्यमातून मी माझा प्रवास सर्वप्रथम जगासमोर मांडला. आणि आता रश्मी ताई व भुजबळ सरांमुळे लिखीत स्वरूपात जगासमोर आलाय.

रश्मीताईच्या शब्दांनी तर कमालच केली आहे. वाचताना आपण एखादा लेख वाचत आहोत, या पेक्षा एखादी शॅार्ट फिल्म बघत आहोत असा भास होतोय एवढा जिवंतपणा रश्मीताईच्या लेखनात आहे.
वाचकांनी..स्नेहीजनांनी या लेखाला..पोस्ट ला भरभरून, मनापासून दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपणा सर्वांची ऋणी आहे. आपले प्रेम, आशिर्वाद व शुभेच्छा कायम सोबत असू द्या. कारण माझा प्रवास आत्ता जेमतेम सुरू झालाय..

एखादे पद मिळवणे हेच फक्त कर्तृत्व होवू शकत नाही तर ती कर्तृत्व सिद्ध करण्याची सुरुवात असते. आणि प्रत्येक यशामागे कोणतीतरी स्टोरी असतेच असा माझा ठाम विश्वास आहे. मला माझे काम उभे करायचे आहे आणि त्यासाठी आपण सर्वांच्या सदिच्छांची मला नितांत गरज आहे…!😊😊🙏🙏
आपली,
प्रांजली बारस्कर
सहायक आयुक्त, वर्ग १ (कौशल्य विकास)
महाराष्ट्र शासन. अमरावती.

श्री योगेश बारस्कर लिहितात….
लहानपणापासूनच संघर्षमय जीवनातून स्वकर्तुत्वाने प्रेरक व्यक्तिमत्व घडविणारी प्रांजली….सहजीवनाची नाते जुळल्यापासून तुझ्या संघर्षाचा, जिद्दीचा मी साक्षात साक्षीदार असल्याने मला अभिमान आहे. I am very fortunate that u are my better half….!

रश्मीताई आपले विशेष आभार. तुम्ही इतका छान प्रांजलीचा प्रवास तुमच्या लेखणीतून मांडल्याबद्दल….! वाचताना सगळं चित्र डोळ्यांसमोर उभे राहत होते ही तुमच्या लेखणीची कमाल आहे.

तसेच भुजबळ सरांचे विशेष आभार. त्यांनी त्यांच्या व्यासपीठावर ही संधी उपलब्ध करून दिली आहे ज्यामुळे मला विश्वास आहे बऱ्याच व्यक्तींना प्रेरणा मिळणार आहे.
आपला
योगेश बारस्कर. अमरावती

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments