Friday, October 17, 2025
Homeबातम्याप्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी सूत्रे स्वीकारली

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी सूत्रे स्वीकारली

नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त पदाची सूत्रे वरिष्ठ आय ए एस अधिकारी प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी नुकतीच स्वीकारली.

या नंतर तातडीने घेतलेल्या बैठकीत त्यांनी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देवून, ते सोडविण्यासाठी महसूल यंत्रणेच्या माध्यमातून मिळणारा प्रतिसाद महत्त्वाचा आहे त्यासाठी विकास कामांची कालमर्यादा पाळा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात.

महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामामधून जनतेला अधिक लोकाभिमूख व परिणामकारक प्रशासन देण्याला प्राधान्य द्यावे, असे सांगताना श्रीमती वर्मा म्हणाल्या की, कोरोना काळात नागपूर विभागाने अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने नियोजन केले होते त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत झाली.

नैसर्गिक आपत्तीच्या काळातही अशाच पद्धतीने विभागात काम करण्याची आवश्यकता आहे. अधिकाऱ्यांनी सोपवलेल्या कामाच्या वेळा निश्चित करुन त्या काल मर्यादेत सोडविण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

विभागीय आयुक्तालय हे नियंत्रण अधिकाऱ्याच्या भूमिकेत न राहता जिल्हास्तरीय यंत्रणेला पूरक म्हणून काम करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेण्यासोबतच केवळ जिल्ह्यातून आलेल्या अहवालावर विसंबून न राहता शेवटच्या घटकाकडून मिळणारा प्रतिसाद यावर अधिक काम करण्याची आवश्यकता असल्याचेही सांगितले.

यावेळी त्यांनी दैनंदिन कामामध्ये येणाऱ्या अडचणी, प्रलंबित असलेले प्रश्न तसेच ते सोडविण्यासाठी विभाग प्रमुखांकडे होत असलेली कार्यवाही याबद्दल विभागनिहाय माहिती घेतली.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संजय धिवरे, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, उपायुक्त सर्वश्री चंद्रभान पराते, शैलेंद्र मेश्राम, धनंजय सुटे, अंकुश केदार, रमेश आडे, श्रीमती राजलक्ष्मी शहा, श्रीमती रेश्मा माळी तसेच सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख उपस्थित होते.

अल्प परिचय
भारतीय प्रशासन सेवेतील 2001 च्या तुकडीच्या सनदी अधिकारी असलेल्या श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथून प्रांत अधिकारी या पदापासून प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. त्या नंतर त्यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे जिल्हाधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालक, सह विक्रीकर आयुक्त, मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, सिडको सहव्यवस्थापकीय संचालक अशी विविध पदे समर्थपणे भूषविली.

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच लोकाभिमुख प्रशासनासाठी त्यांचा गौरव झाला आहे. मराठी भाषा विभागाच्या सचिव या पदावर कार्यरत असताना श्रीमती वर्मा यांनी शासनाने नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त पदावर त्यांची नियुक्ती केली. त्या नागपूर विभागाच्या पहिल्या महिला आयुक्त आहेत.

– देवेंद्र भुजबळ. 9869484800.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. आदरणीय प्राजक्ता लवंगारे- वर्मा मॅडम नागपूरच्या विभागीय आयुक्त पदी नियुक्ती झाल्याची बातमी तपशीलवारपणे देऊन तसेच अल्प परिचय चांगल्या लेखन शैलीत देऊन आपण फार मोठे काम केले आहे. न्यूज स्टोरी टुडे हे पोर्टल आम्हाला खूप आवडते. याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन ….

  2. उत्कृष्ट लेख आहे. माननीय प्राजक्ता यांच्या कार्यशैलीस सलाम. कामाचे उत्तम नियोजन, वाखाणण्याजोगी आहे. भुजबळ सरांनी त्यांच्या लेखणी शैलीत खूपच सुंदर मांडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप