Home बातम्या प्रा डॉ यशोधरा वराळे सन्मानित

प्रा डॉ यशोधरा वराळे सन्मानित

0

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भीम फेस्टिवल -२०२३ कार्यक्रमात माजी खासदार एस के डिगे फाउंडेशन तर्फे मुंबई येथील डॉ आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य प्रा डॉ यशोधरा वराळे यांना, त्या विविध माध्यमातून निस्वार्थीपणे करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल
समाजरत्न भिमक्रांती पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा डॉ सुवर्णा यादव होत्या.

प्राचार्य प्रा डॉ यशोधरा वराळे

या प्रसंगी प्रा डॉ अक्षता गावडे, कार्यक्रमाचे आयोजक श्री सदानंद डिगे, विविध मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा डॉ यशोधरा वराळे यांचे आजोबा बळवंतराव हणमंतराव वराळे हे बाबासाहेब आंबेडकरांचे ३४ वर्षे जवळचे सहकारी होते.
या बाबत वराळे मॅडम यांनी लिहिलेला “बाबासाहेब: चिरंतन ठेवा” हा लेख आपल्या पोर्टलवर बाबासाहेबांच्या जयंती दिनी, नुकताच १४ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला आहे. जिज्ञासूंनी तो अवश्य वाचवा.

प्रा डॉ यशोधरा वराळे मॅडम यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version