गंगाखेड येथील श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने “कथा सम्राट प्रेमचंद” यांच्या 143 व्या जयंती समारोहाचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. दयानंद उजलंबे यांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषा व प्रेमचंद यांच्या साहित्याचे महत्व सांगितले व हिंदी भाषा अवगत करण्यासाठी प्रेरित केले.

या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून हिंदी विभाग प्रमुख प्रो.डॉ.एम.डी. इंगोले यांनी प्रेमचंद यांच्या कथा साहित्यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकताना म्हणाले, “प्रेमचंद यांनी जनसामान्यांच्या प्रश्नाना आपल्या साहित्याचा केंद्र बिंदु मानले.” बालमनोविज्ञान, शेतकरी, शेतमजूर, कामगार, प्रशासन व्यवस्था, विधवा समस्या, अनमेल विवाह, बेरोजगारी, आर्थिक विषमता, पारिवारिक समस्या, भ्रष्टाचार, दलित समस्या, इ. विषयांवर प्रेमचंद यांनी आपली लेखणी चालवली. या प्रसंगी प्रा.डॉ. एम.आर.हाके यांनी प्रेमचंद यांच्या ‘सदगती’ कथेवर भाष्य केले.
कार्यक्रमाचे संयोजन प्रा.डॉ.एन.एस.भेंडेकर व गणेश कदम, नासीर कुरेशी, कु.अरूणा बेले, कु.जयश्री किंगरे यांनी केले. सूत्र संचालन कु.स्मीता कांबले, प्रस्तावना कु.पुजा इप्पर, प्रेमचंदचा साहित्यिक परिचय कु.कोमल जाधव व आभार कु.संध्या भोसले हीने मानले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ.संजीव कोलपे, प्रा. डॉ.चिमनगुंडे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्राचार्य डॉ.बी.एम.धूत, उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत सातपुते, उपप्राचार्य संतोष गायकवाड, कार्यालय अधीक्षक भारत हत्तीअंबीरे, यांनी प्रेरणा दिली. तर यशस्वितेसाठी सुरक्षा रक्षक जवादे व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी सहकार्य केले.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800