Home बातम्या फार्मसी महाविद्यालयात संशोधन स्पर्धा

फार्मसी महाविद्यालयात संशोधन स्पर्धा

0

महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे रायगड दर वर्षी विद्यापीठ स्तरावर आविष्कार स्पर्धेचे आयोजन करते.

या स्पर्धेसाठी प्रत्येक महाविद्यालयातून विद्यार्थी सहभागी होत असतात. या स्पर्धेसाठी विद्यार्थी निवड करण्यासाठी कवठे महांकाळ येथील नूतन फार्मसी महाविद्यालयात नुकतेच आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. नुतन माळी, सचिव डॉ. रामलिंग माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमोल पाटील, प्राचार्य डॉ. नवनाथ कल्याने यांच्या हस्ते व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत झाले.

विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादरीकरण पोस्टर व मॉडेल्स च्या माध्यमातून केले. सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पाविषयी सर्व उपस्थितांना संपूर्ण माहिती दिली. तसेच या प्रकल्पामुळे होणारे सामाजिक फायदे विशद केले.

परीक्षकांनी मेडिसिन व फार्मसी, प्युअर सायन्स व अॅग्रीकल्चर अश्या विविध विभागातून तृतीय वर्ष बी. फार्मसीच्या कु. मोहिनी जाधव, कु. निकिता कदम, कु. अक्षय डांगे, कु. गंगा जंगम, कु. सई खोत, कु. स्नेहल कांबळे द्वितीय वर्ष बी. फार्मसीच्या कु. सुहानी जाधव, कु. साक्षी कोळी, अंतिम वर्ष बी. फार्मसीच्या कु. प्रणाली पाटील, यांची निवड करुन त्यांना प्रमाणपत्रां द्वारे गौरविण्यात आले व तसेच पुढील विद्यापीठस्तरावरील होणाऱ्या अविष्कार स्पर्धेसाठी केली शुभेच्छा देण्यात आल्या.

या विद्यार्थ्यांना प्रा. मनोहर केंगार, प्रा. मयुर सोनार, प्रा. दीपक करे यांचे मार्गदशन लाभले. तर डॉ. सतिश खिलजे, डॉ. अमोल पाटील, डॉ. नवनाथ कल्याने प्रा. प्रमोद चिक्कोडी, शरद कांबळे हे परीक्षक लाभले. आविष्कार समन्व्यक म्हणून प्रा. प्रशांत ऐवळे यांनी काम पाहिले.

या महाविद्यालयीन स्तरावरील आविष्कार संशोधन स्पर्धेच्या मार्फत ईतर विद्यार्थ्यांना देखील या स्पर्धे बद्दल मार्गदर्शन लाभले.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version