Monday, February 2, 2026
Homeसाहित्यफेसबुक लाईव्ह कथा वाचन महोत्सव यशस्वी

फेसबुक लाईव्ह कथा वाचन महोत्सव यशस्वी

मराठी भाषा पंधरवड्याचे औचित्य साधून साहित्यसंपदा आयोजित ‘गोष्टी तुमच्या आमच्या’ या तीन दिवसीय फेसबुक लाईव्ह कथावाचन महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या वाचन सोहळ्यात महाराष्ट्रातीलच नव्हे तर बेंगलोर, कतार, सिंगापूर, अमेरिका येथील विविध भागांतून, कथाकारांनी यशस्वी सहभाग नोंदविला.

या कथावाचन सोहळ्यात अनेक नामवंत कथाकार आणि महाराष्ट्रातील विविध ७ शाळा सहभागी झाल्या होत्या. यात बेंगळुरू येथील साहित्यिका परवीन कौसर यांनी एका कथा स्पर्धेत पहिल्या क्रमांकाची मानकरी ठरलेली “माणुसकीची गुढी” ही कथा वाचली. याचबरोबर “मैत्री दिवस” या लघुकथेचेही त्यांनी वाचन केले.

परवीन कौसर

ऑनलाईन सांगता समारंभास उपक्रमाचे कौतुक करताना जेष्ठ साहित्यिक श्री गणेश राजन लाखे यांनी वाचन चळवळीचे महत्व उदाहरणासहित उलगडून दाखविले.

लेखिका डॉ.सोनाली लोहार यांनी शाळेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना वाचन संस्कृतीची बीजे मुलांच्या मनात रुजविणे गरजेचे आहे अशी भावना व्यक्त केली.

बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी उपक्रमाचे कौतुक करताना कथावाचन महोत्सवातील सर्व सहभागींना शुभेच्छा दिल्या.

कार्यकारणी सदस्य अपेक्षा बिडकर, सलोनी बोरकर, वैशाली कदम, अर्चना गोरे, मानसी नेवगी, किसन पेडणेकर, स्मिता पेशवे, लालसिंग वैराट, स्मिता हर्डीकर, मंजुळ चौधरी आदींनी आपले समयोचित मनोगत व्यक्त केले.

या कथावाचन महोत्सवाचे वैशिष्टय म्हणजे शुभंकरोति साहित्य मंच, मुंबई, साहित्यिक सखी ग्रुप, उदगीर, अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान, कल्याण, शब्दशिल्प कलाविष्कार संघ, मुंबई, अभिनव फाउंडेशन, भडगाव या महाराष्ट्रातील विविध भागांतील संस्थांनी सहभाग नोंदविला. डिजिटल पार्टनर मनोमय मीडिया यांनी काम पाहिले.

सदर सांगता सोहळ्यास अश्विनी निवर्गी यांनी आपल्या साहित्यिक सखी उदगीर संस्थेची ओळख करून देताना गृहिणींनी नवीन टेक्नॉलॉजीचे आव्हान लीलया पेलले असे म्हणून सर्व महिला कथाकारांचे अभिनंदन केले.

सोनाली जगताप यांनी शुभंकरोति साहित्य मंच आगामी उपक्रमांत देखील सहभागी राहून मराठी भाषेसाठी कार्य करीत राहील असे आश्वासन देऊन या उपक्रमास विशेष मदत केलेल्या अजित महाडकर, गीतांजली वाणी, मयूर पालकर, माया यावलकर यांचे आभार मानले.

या कथावाचन सोहळ्याचे संकल्पनाकार वैभव धनावडे यांनी सर्व मान्यवरांचे, सहभागी संस्था, शाळा आणि सहभागी वाचकांचे आभार मानताना मराठी भाषेच्या सेवेसाठी सातत्याने नवं नवीन प्रयोग राबविण्याची ग्वाही दिली.

शासनाने अश्या उपक्रमांची दखल घेऊन कौतुकाची थाप सदर संस्थांना द्यावी अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Anil Deodhar on झेप : 9
Vinod Ganatra on झेप : 9