Home बातम्या बचतगटाच्या महिला विमानात !

बचतगटाच्या महिला विमानात !

0

महिला बचत गटाच्या सुरुवातीच्या दिवसात या महिलांकडे दयेच्या, सहानुभूतीच्या नजरेने पाहिले जायचे. आज मात्र परिस्थिती खूप बदलली आहे, बदलत आहे, हे मोठेच आश्वासक चित्र आहे.

याचे एक चांगले उदाहरण नुकतेच पहायला मिळाले. ते म्हणजे, एका बचत गटाच्या महिलांनी केलेला विमान प्रवास !

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील प्रगती बचतगट फेडरेशनच्या अध्यक्षा व बचतगटातील एक महिला हेमलता चिंबुलकर आणि बचतगट फेडरेशनच्या व्यवस्थापिका पदमावती गायकवाड या सर्व हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या बचतगट फेडरेशन बँक लिंकेज आणि बचतगट फेडरेशन ॲवार्ड कार्यक्रम व परिषदेसाठी तेलंगणा येथे उपस्थित राहण्यासाठी चक्क विमानाने गेल्या !

महाराष्ट्रामध्ये बचतगट चळवळ आणि बचतगट फेडरेशन कशा प्रकारे कार्यरत आहे, याची माहिती यावेळी त्यांनी परिषदेत दिली.

या परिषदेसाठी साठी भारतातील एकूण 20 राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येक राज्यातील महिलांचे विचार, आचार अनुभवायला मिळाले, उत्साह पाहायला मिळाला, महिलांनी ठरविले तर त्या खूप काही करू शकतात, अशी माहिती प्रगती बचतगट फेडरेशनच्या अध्यक्षांनी आपल्या मनोगतातून दिली.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version