Saturday, March 7, 2026
Homeसाहित्यबाल कविता

बाल कविता

गंमत

आई तुला सांगू का गंमत नंबर वन
ऐकून हसशील एकदम खुदकन

पावसाची एकदा हरवली छत्री
आपल्या घरी आला काल रात्री

आकाशात ढगांची पकडापकडी
मध्येच वीजेनं घातली लंगडी

पावसानं सारी शेतं झाली ओली
हिरवा टॉवेल पांघरून बसली

सकाळी झाडांना थंडी वाजली
धुक्याच्या शाली पांघरून बसली

कडक उन्हाने डोंगर तापले
टॅन होऊन काळवंडून गेले

भरभर भरभर फिरून आला वारा
म्हणाला डोकं फिरतंय गरागरा

खूप खूप थंडीत सूर्य गारठला
सकाळी त्याने लाल स्वेटर घातला

रात्री झाडांनी रंगीत कपडे बदलले
मग काळेपांढरे नाईटड्रेस घातले

हसून आई म्हणाली गमती झाल्या खूप
डोळे मिटून झोप बघू एकदम चूप !

— रचना : वेदवती कुलकर्णी. विलेपार्ले पूर्व. मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Pranita Khandkar on संगती रंग : ४
पुरुदत्त रत्नाकर on संगती रंग : ४
Vedvati Kulkarni on झेप : 14
Swati Naik on अभंग : ओढ
मृदुला राजे on ऋतुराज वसंत